नेमका कुठं पर्यंत असणार हा मार्ग?
मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई-पुणे अंतर सुमारे आठ किलोमीटरने कमी होणार असून प्रवासाचा वेळही खूप कमी होणार आहे. 6,695.37 कोटी रुपये खर्च करून हा मार्ग उभारला जात आहे. खालापूर टोलनाका ते थेट लोणावळा परिसरातील सिंहगड कॉलेजपर्यंत हा मार्ग असणार आहे.
या प्रकल्पाचे काम ऑफकॉन कंपनीकडून करण्यात येत असून बोगद्याचे काम नवयुग इंजिनिअरिंग करत आहे. सह्याद्री पर्वतरांगांमधील चावणी गावाच्या हद्दीत वायर लूप पद्धतीचा भव्य पूल उभारण्यात येत आहे. या पुलाची उंची जमिनीपासून 135 मीटर असून लांबी 645 मीटर आहे. याशिवाय 900 मीटर लांबीचे दोन समांतर पूलही बांधले जात आहेत.
advertisement
डोंगराच्या पोटातून 150 मीटर खोल दोन समांतर बोगदे तयार केले जात आहेत. यामध्ये एक बोगदा 1.75 किलोमीटर तर दुसरा बोगदा तब्बल 8.92 किलोमीटर लांबीचा आहे. दोन्ही बोगद्यांची रुंदी 21.45 मीटर आहे. डिसेंबर 2025 संपूनही काम पूर्ण न झाल्याने 2026 उजाडले तरी वाहतूक सुरू झालेली नाही. सध्या पुलाच्या कामाचा अंतिम टप्पा सुरू असून किमान आणखी तीन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे सध्या तरी बोरघाटातील वाहतूक कोंडी कायम आहे.
