TRENDING:

कार, ट्रेननंतर आता थेट पाण्यातून प्रवास! मुंबई ते नवी मुंबई लवकरच सुरू होणार वॉटर टॅक्सी!

Last Updated:

Mumbai to Navi Mumbai Water Taxi: मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारने जलवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुंबई ते नवी मुंबई नवीन वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मुंबईकरांच्या कामाची बातमी आहे. मुंबई ते नवी मुंबई प्रवास आता कोंडीमुक्त होणार आहे. गेटवे ऑफ इंडिया ते नवी मुंबई विमानतळ येथे लवकरच वॉटर टॅक्सी सुरू करण्यात येणार आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी बंदर विभागाने वॉटर टॅक्सीबाबतचे नियोजन पूर्ण करावे आणि गरजेच्या ठिकाणी जेटी उभारण्याचा प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना दिल्या आहेत.
कार, ट्रेननंतर आता थेट पाण्यातून प्रवास! मुंबई ते नवी मुंबई लवकरच सुरू होणार वॉटर टॅक्सी!
कार, ट्रेननंतर आता थेट पाण्यातून प्रवास! मुंबई ते नवी मुंबई लवकरच सुरू होणार वॉटर टॅक्सी!
advertisement

मुंबई आणि नवी मुंबई वॉटर टॅक्सीने जोडण्याच्या संदर्भात सोमवारी मंत्रालयात बैठक झाली. यावेळी नितेश राणे यांनी वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी टर्मिनल उभारणी सुरू करावी. तसेच यासाठी विमानतळ प्राधिकरणने आश्यक परवानग्यांसाठी प्रस्ताव सादर करावेत. माल वाहतुकीसाठीही जेटी उभारण्यासाठी ठिकाणे निश्चित करावीत, अशा सूचना राणे यंनी यावेळी दिल्या आहेत. बंदरे आणि हवाई वाहतूक विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी, नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणचे ब्रिजेश सिंघल, महाराष्ट्र सागरी मंडळाचे प्रदीप बढीये यांच्यासह विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

advertisement

Thane Water Cut: पाणी आताच भरुन घ्या आणि तारीखही लिहून घ्या! ठाण्यात या दिवशी बंद राहणार पाणीपुरवठा

प्रवासाचा वेळ वाचणार

मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारने जलवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नवीन वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. या सेवेमुळे मुंबईची नवी मुंबईतील विविध भागांशी कनेक्टिव्हिटी सुधारेल. प्रवासाची वेळ सुमारे 40 मिनिटे असेल.

advertisement

प्रदुषण कमी

या वॉटरटॅक्सी सेवांमध्ये इलेक्ट्रिक बोट्सचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि पर्यावरणाला देखील फायदा होईल. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाशांना आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल. जलवाहतुकीच्या या नव्या योजनेमुळे मुंबईकरांचा प्रवास जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक होईल.

मराठी बातम्या/मुंबई/
कार, ट्रेननंतर आता थेट पाण्यातून प्रवास! मुंबई ते नवी मुंबई लवकरच सुरू होणार वॉटर टॅक्सी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल