Thane Water Cut: पाणी आताच भरुन घ्या आणि तारीखही लिहून घ्या! ठाण्यात या दिवशी बंद राहणार पाणीपुरवठा
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Thane Water Cut: ठाण्यात पाणीपुरवठा खंडित राहणार असल्याने पाणी जपून वापरा, असे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहेत.
ठाणे: ठाणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी असून ऐन पावसाळ्यात पाणीबाणीची स्थिती निर्माण होणार आहे. 4 जून रोजी शहरातील काही भागात पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. बुधवारी शहरातील काही भागात पाणीपुरवठा 12 तासांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी पाणी काटकसरीने आणि जपून वापरावे, असे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
ठाणे महापालिकेच्या स्वयंचलित पाणीपुरवठा योजनेतील टेमघर जलशुद्धीकरण केंद्रात पावसाळ्यापूर्वी अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीची कामे केली जातात. कंट्रोल पॅनलची दुरुस्ती आणि ट्रान्सफॉर्मर ऑइल फिल्ट्रेशन ही कामे बुधवारी 4 जून रोजी हाती घेतली जाणार आहेत. या कामांमुळे 4 जून रोजी सकाळी 9:00 ते रात्री 9:00 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. या काळात नागरिकांना पाणी जपून वापरावं लागेल.
advertisement
पाणीपुरवठा बंद राहणारे भाग
ठाण्यातील घोडबंदर रोड, वर्तक नगर, रुस्तमजी, सिध्दांचल, समता नगर, ऋतू पार्क, जेल परिसर, गांधी नगर, सिध्देश्वर, इंटरनिटी, जॉन्सन आणि कळव्याच्या काही भागातील पाणीपुरवठा 4 जून रोजी बंद राहील. सकाळी 9:00 ते रात्री 9:00 या 12 तासांच्या कालावधीत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असेल. तर इतर भागांत स्टेम प्राधिकरणामार्फत झोनिंगद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवला जाईल.
advertisement
दरम्यान, 12 तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने पाणी जपून वापरा, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे. याची नोंद ठाणेकरांनी घ्यावी आणि आवश्यक पाण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना देखील करण्यात आल्या आहेत.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
June 03, 2025 7:50 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Thane Water Cut: पाणी आताच भरुन घ्या आणि तारीखही लिहून घ्या! ठाण्यात या दिवशी बंद राहणार पाणीपुरवठा