मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) बीकेसी, वरळी आणि सीएसएमटी या स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी खासगी कंपनी सिटीफ्लो सोबत करार केला आहे. या फीडर बसमुळे प्रवाशांना मेट्रो स्टेशनहून जवळच्या कार्यालयांपर्यंत सहज पोहोचता येईल. मात्र, बेस्टऐवजी खासगी बससेवेशी करार केल्याने टीका होत आहे.
Weather Alert: मुंबईकर आज छत्री सोबत ठेवा, कोकणात पुन्हा धो धो कोसळणार, IMD चा अलर्ट
advertisement
जास्त भाड्याचा मुद्दा
सिटीफ्लोच्या बससाठी किमान भाडे 29 रुपये ठेवण्यात आले आहे. हे बेस्टच्या किमान भाड्यापेक्षा तब्बल अडीच पट जास्त आहे. त्यामुळे आधीच प्रवासी घट आणि तोट्याच्या समस्येला तोंड देणाऱ्या बेस्टच्या अडचणीत आणखी भर पडेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
सिटीफ्लोच्या बसेसचा मार्ग मेट्रो स्थानकांपासून प्रमुख व्यावसायिक क्षेत्रांपर्यंत असेल.
बीकेसी मार्ग: एनएसई, जिओ गार्डन, वन बीकेसी आणि कौटुंबिक न्यायालय परिसर
वरळी मार्ग: सेंच्युरी मिल्स, वन इंडिया बुल्स सेंटर, कमला मिल्स आणि पेनिन्सुला कॉर्पोरेट पार्क
सीएसएमटी मार्ग: जुना कस्टम हाऊस, लायन्स गेट, एस. पी. मुखर्जी चौक, के. सी. कॉलेज आणि चर्चगेट मेट्रो
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी परिवहन विभागाने सिटीफ्लो आणि उबरच्या ॲप-आधारित बससेवांवर परवानगी नसल्याने कारवाई केली होती. आता त्याच कंपनीसोबत एमएमआरसीने करार केल्याने निवड प्रक्रियेतील निकषांविषयी विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.