मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील सरसारी पाणीपुरवठा 12 टक्क्यांवर आला आहे. परंतु, त्याचा नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार नसल्याची हमी महापालिकेने दिलीये. तसेच मुंबईला 31 जुलैपर्यंत पुरेसा पाणीपुरवठा होईल, अशा रीतीने नियोजन केल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आलेय.
कार, ट्रेननंतर आता थेट पाण्यातून प्रवास! मुंबई ते नवी मुंबई लवकरच सुरू होणार वॉटर टॅक्सी!
advertisement
अवकाळी पावसानंतरही जलसंकट
यंदा मुंबईत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, पावसानंतर देखील मुंबईवर उन्हाच्या झळांचा मारा सुरूच आहे. त्याचा परिणाम धऱणातील पाणीसाठ्यावर होत आहे. काही आठवड्यांपूर्वीच पालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. त्यात पाणीपुरवठ्यात कपातीचा मानस नसल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आलेय. तसेच राज्य सरकारने देखील ‘निभावणी साठ्या’तून मुंबईला पाणी उपलब्ध करून दिलेय.
जूनचा पहिला आठवडा कोरडा
यंदा मे महिन्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तर मान्सून देखील 10 दिवस लवकरच दाखल झाला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत पाऊस दडी मारून बसला आहे. जूनचा पहिला आठवडा कोरडाच जाण्याची शक्यता आहे. परंतु, त्यानंतरच्या काळात पावसाने वेळेत हजेरी लावल्यास पाणीकपातीचं संकट अजिबात राहणार नाही, असे पालिका सूत्रांनी सांगितले.