यंदाच्या वर्षी देखील सिडको लॉटरीसाठी अनेक नवी मुंबईकरांनी अर्ज भरला होता. पण अनेक इच्छुक नागरिकांना वेळेची कमतरता जाणवली. याच पार्श्वभूमीवर सिडकोच्या घरांसाठी अर्ज भरण्याच्यी तारीख वाढवण्यात आली आहे. या आधी मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी देखील तारखा वाढवण्यात आल्या होत्या. या तारखा पूर्वी 8 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर होत्या नंतर या तारखा 19 सप्टेंबर करण्यात आल्या होत्या.
advertisement
आता 11 डिसेंबरपर्यंत करता येणार अर्ज
सिडकोच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत आधी 11 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर होती. मात्र दिवाळी आणि सर्वत्र सुरू असलेल्या निवडणुकीच्या वातावरणामुळे अनेक इच्छुकांना अर्ज भरताना येत नव्हते. म्हणून सिडकोने ही तारीख वाढवली 11 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकर अर्ज भरावेत.
किती घरांसाठी लॉटरी?
नवी मुंबई सिडकोच्या अंतर्गत 27 जागांवर एकूण 67 घरे होती. त्या पैकी 43 हजारघरांवर आतापर्यंत नागरिकांना ताबा मिळाला असून उर्वरित 24 हजारहून अधिक घरांसाठी इच्छुक अर्ज करु शकतात. आतापर्यंत 81 हजार नागरिकांनी ऑनलाईन अर्ज केला असून 22 हजार पेक्षा जास्त नागरिकांनी ऑनलाईन पैसे देखील भरले आहेत. सिडकोच्या घरासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी अर्ज भरावे, यासाठी सिडकोचे प्रयत्न सुरू आहेत.