घराबाहेर पडण्याआधी पर्यायी मार्ग पाहा
वाशी परिसरात 14 ते 16 जानेवारीदरम्यान सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत वाहतूक निर्बंध असणार आहेत. 14 जानेवारीला ईव्हीएम मशीनची वाहतूक, 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार असल्यामुळे हे निर्बंध लावण्यात आले आहेत. वाशी सेक्टर 12 मधील नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्विमिंग पूल इमारतीत वॉर्ड क्रमांक 16, 17 आणि 18 साठी स्ट्रॉंगरूम तयार करण्यात आली आहे. याच ठिकाणाहून निवडणूक साहित्याचे वाटप होणार आहे. परिसरात तीन मतदान केंद्रे असल्याने निवडणूक कर्मचाऱ्यांच्या हालचालींना अडथळा येऊ नये यासाठी काही रस्त्यांवर वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.
advertisement
कोपरखैरणे परिसरात वाहतूक बदल, काही रस्ते बंद
कोपरखैरणे परिसरातही वाहतूक बदल करण्यात आले आहेत. कोपरखैरणेहून वाशी रेल्वे स्थानकाकडे जाणारी वाहतूक ब्लू डायमंड चौक ते बेसिन कॅथोलिक बँक चौक दरम्यान बंद राहणार आहे. तसेच वाशी रेल्वे स्थानकातून कोपरखैरणेकडे जाणाऱ्या वाहनांसाठी कॅथोलिक बँक चौक ते परफेक्ट सेरॅमिक–IDBI बँक चौक दरम्यान वाहतूक बंद असेल.
नागरिकांच्या सोयीसाठी वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग सुचवले आहेत. कोपरखैरणेहून वाशी स्थानकाकडे जाणाऱ्यांनी कोपरी सिग्नल आणि पाम बीच रोडचा वापर करावा. वाशी स्थानकाकडून कोपरखैरणेकडे जाणाऱ्यांनी गावदेवी मंदिराजवळ डावे वळण घेऊन, सेक्टर 12 मधील जुहूगाव खाडीकिनारी रस्त्याने IDBI बँक जंक्शनमार्गे पुढे जावे. निवडणूक काळात नागरिकांनी वाहतूक निर्बंधांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी केले आ
