TRENDING:

Mumbai : प्रवास होणार सुसाट! नवीन टिळक पुलामुळे दादरमधील वाहतूक कोंडी फुटणार; पाहा कधी होणार सुरू

Last Updated:

Mumbai Tilak Bridge Update : दादरमधील रहिवाशांसाठी एक नवीन टिळक पुलाबाबत महत्त्वाची बातमी समोर आली असून या बातमीमुळे नागरिकांना मनस्ताप होणार की आनंद होणार हे जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : दादर हे शहर अनेक महत्त्वाच्या शहरापैंकी एक आहे. जिथे शहराचा विकास झपाट्याने होत असून अनेक महत्त्वाचे पूल आणि रस्ते प्रकल्पाचे कामही सुरु आहेत. त्यातील याच शहरातील एक महत्त्वाचा असलेल्या टिळक पुलाबाबताची एक मोठी माहिती समोर आलेली आहे.
Mumbai Tilak Bridge Update
Mumbai Tilak Bridge Update
advertisement

नवीन टिळक पूल आता अखेरच्या टप्प्यात

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन आणि मुंबई महापालिकेच्या संयुक्त प्रकल्पाद्वारे हा पूल उभारला जात आहे. विद्यमान पूल जड वाहतुकीच्या ताणाला सहन करू शकत नसल्यामुळे आणि दादर स्थानकाच्या विस्तारीकरणात अडथळा निर्माण होत असल्यामुळे नवीन पुलाची रचना बो-स्ट्रिंग गर्डर पद्धतीने करण्यात आली आहे. यामुळे रेल्वे रुळांच्या मधोमध एकही खांब येणार नाही आणि वाहतुकीला आणि पूलाच्या सुरक्षिततेला कोणताही धोका होणार नाही.

advertisement

पूर्व-पश्चिम जोडणारा पूल कधी होणार?

दादर परिसरातील हा पुल शंभर वर्षांहून जुना आहे आता या पुलाच्या जागी नवा पुल उभारण्यात येत आहे. नव्याने होत असलेल्या हा आधुनिक उड्डाणपुल 70 टक्के पूर्ण झाला असून येत्या 2026 च्या अखेरीस वाहतुकीसाठी खुला होणार आहे.पायाभरणीचे काम पूर्ण झाले असून पूर्व-पश्चिमेकडील खांब उभारण्यात आले आहेत. रेल्वे रुळांवर स्टील गर्डर्स बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे तर पूलाला जोडणाऱ्या पोच रस्त्याचे कामही सुरू आहे.

advertisement

ट्रॅफिक कोंडीवर प्रभावी उपाय ठरणार हा पुल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांना दिलासा! 15 मिनिटांचा वेळ वाचणार, भिडे पुलावरील काम अंतिम टप्प्यात
सर्व पहा

अत्यंत गर्दी आणि मर्यादित मेगाब्लॉक्समुळे काम करताना प्रशासनास मोठे आव्हान आहे. नवीन पुलामुळे दादर टीटी ते दादर पश्चिम दरम्यान प्रवास वेगवान होईल आणि परिसरातील वाहतूक कोंडी निम्म्यापर्यंत कमी होईल. जड वाहनेही आता सुरक्षितपणे येथून जाऊ शकतील. मे-जून 2026 पर्यंत पुलाचे मुख्य स्ट्रक्चर उभे करण्याचे उद्दिष्ट असून वर्षाअखेरीस हा मुंबईकरांच्या सेवेत देण्यात येईल.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : प्रवास होणार सुसाट! नवीन टिळक पुलामुळे दादरमधील वाहतूक कोंडी फुटणार; पाहा कधी होणार सुरू
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल