तरुणांनो लगेच करा अर्ज
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच NHAI मध्ये परीक्षेशिवाय सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. एनएचएआयने डेप्युटी मॅनेजर या पदासाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती पूर्णपणे टेक्निकल विभागासाठी करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळ nhai.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती?
advertisement
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 9 जानेवारी 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 फेब्रुवारी 2026 आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी सुमारे एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. या भरतीअंतर्गत तब्बल 40 पदे भरली जाणार आहेत.
निवड झालेल्या उमेदवारांना केंद्र सरकारच्या लेव्हल 10 वेतनश्रेणीनुसार 56,100 ते 1,77,500 रुपये इतका आकर्षक मासिक पगार मिळणार आहे. ही नोकरी कायमस्वरूपी असून भविष्यात बढती आणि इतर सरकारी सुविधा देखील मिळणार आहेत.
निवड कशा प्रकारे होणार?
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. विशेष बाब म्हणजे या नोकरीसाठी कोणतीही स्वतंत्र लेखी परीक्षा होणार नाही. उमेदवारांची निवड GATE 2025 च्या गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. शैक्षणिक पात्रतेबाबत बोलायचे झाल्यास उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेली असावी. तसेच उमेदवाराकडे वैध GATE स्कोअरकार्ड असणे अनिवार्य आहे. पात्र उमेदवारांसाठी ही भरती एक उत्तम संधी मानली जात आहे.
