TRENDING:

Mumbai : पवईत 17 मुलांना डांबणाऱ्या रोहित आर्यचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू, रुममध्येच गोळीबाराचा थरार

Last Updated:

मुंबईच्या पवई भागात 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्य याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. या एन्काऊंटरमध्ये रोहित आर्य याचा मृत्यू झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबईच्या पवई भागात 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्य याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. या एन्काऊंटरमध्ये रोहित आर्य याचा मृत्यू झाला आहे. ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका करताना रोहित आर्यने पोलिसांवर गोळीबार केला, या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना पोलिसांनाही त्याच्यावर गोळीबार करावा लागला. या गोळीबारामध्ये रोहित आर्यचा मृत्यू झाला आहे.
पवईत 17 मुलांना डांबणाऱ्या रोहित आर्यचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू, रुममध्येच गोळीबाराचा थरार
पवईत 17 मुलांना डांबणाऱ्या रोहित आर्यचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू, रुममध्येच गोळीबाराचा थरार
advertisement

मुंबईच्या पवई भागातील एका स्टुडिओमध्ये रोहित आर्य याने 17 मुलांना ओलीस ठेवलं होतं. यानंतर पोलिसांनी तातडीने ऍक्शन घेत या मुलांची सुटका केली आहे. पोलिसांनी बाथरूममधून मुलांना ओलिस ठेवलेल्या ठिकाणी प्रवेश केला. मुलांची सुटका करत असताना पोलिसांना गोळीबारही करावा लागला.

ही घटना पवईमधल्या आरए स्टुडिओमध्ये घडली, जिथे अभिनयाचे वर्ग नियमितपणे घेतले जातात. मुलांना ओलीस ठेवणाऱ्या व्यक्तीचे नाव रोहित आर्य असल्याची माहिती समोर आली आहे. रोहित आर्य हा स्टुडिओमधलाच कर्मचारी आहे आणि तो एक युट्युब चॅनलही चालवतो. मागच्या चार ते पाच दिवसांपासून रोहित परिसरात ऑडिशन्स घेत होता. गुरूवारी सकाळी 100 मुले ऑडिशन्ससाठी आली तेव्हा त्याने 80 मुलांना बाहेर जाण्याची परवानगी दिली. पण 17 मुलांना आतच कोंडून ठेवले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उच्चशिक्षण घेऊनही मिळाली नाही नोकरी, सुरू केला फूड स्टॉल, आता दिवसाला इतकी कमाई
सर्व पहा

मुलांना कोंडून ठेवल्यानंतर रोहित आर्यने एक व्हिडिओ शेअर केला. 'मी एक योजना आखली, मला काही लोकांसोबत बोलायचं आहे. माझ्या मागण्या मोठ्या आर्थिक नाहीयेत, तर नैतिक आहेत. मला प्रश्न विचारायचे आहेत आणि उत्तरे मिळवायची आहेत. मी दहशतवादी नाही. मी आक्रमक हालचाली करून चिथावणी देऊ शकतो. मला उत्तेजित करू नका', असं रोहित आर्य त्याच्या व्हिडिओमध्ये म्हणाला होता.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : पवईत 17 मुलांना डांबणाऱ्या रोहित आर्यचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू, रुममध्येच गोळीबाराचा थरार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल