TRENDING:

सकारात्मक, यशस्वी आयुष्य कसं जगावं, याचे धडे देणारी महिला; 25 हजार लोकांना केलं प्रेरित, कोण आहेत डॉ. रेखा काळे?, VIDEO

Last Updated:

रेखा काळे असे या महिलेचे नाव आहे. शिक्षणाच्या जोरावर त्यांन गरिबीच्या परिस्थितीवर मात करत कॉलेजमध्ये मानसशास्त्राचे शिक्षण घेतले. रेखा काळे आजपर्यंत 25 हजारपेक्षा जास्त अधिक लोकांना प्रेरित करुन सकारात्मकतेचे धडे दिले आहेत. जाणून घेऊयात, त्यांचा हा प्रवास.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रियांका जगताप, प्रतिनिधी
advertisement

मुंबई : अनेकांना नैराश्य ग्रासते. त्यामुळे आयुष्यात एका वेगळ्याच दिशेने भरकटते. त्यामुळे अनेक जणांना इतरांना प्रेरित करण्याचे काम करतात. त्यातून या सर्व नैराश्यातून बाहेर काढत आयुष्य कसे जगायचे, याचे धडे देतात. आज अशाच एक महिलेची कहाणी आपण जाणून घेणार आहोत.

रेखा काळे असे या महिलेचे नाव आहे. शिक्षणाच्या जोरावर त्यांन गरिबीच्या परिस्थितीवर मात करत कॉलेजमध्ये मानसशास्त्राचे शिक्षण घेतले. रेखा काळे आजपर्यंत 25 हजारपेक्षा जास्त अधिक लोकांना प्रेरित करुन सकारात्मकतेचे धडे दिले आहेत.

advertisement

रेखा काळे यांना अनेकदा अपयश आले. त्यात परिस्थितीही बिकट होती. मात्र, त्यावरही मात करून, अनेक कठीण प्रसंगांचा सामना करून आयुष्यात कसे व्हायचे याबाबतचा प्रवास आपल्या संवादात सांगितला. डॉ. रेखा काळे यांच्या करिअरची सुरुवात कॉलेजमध्ये शिकवण्यापासून झाली. 1978 मध्ये मी कॉलेजमध्ये शिकवायला सुरुवात केली. मात्र, रिझर्वेशन पॉलिसीमुळे रिझर्व कॅटेगरीची मंडळी आली की, मला दुसरे कॉलेज शोधावे लागायचे. असे करत करत अनेक कॉलेजेस झाली आणि 1991 मध्ये आऊट ऑफ सिटी मी रेकीचं प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणानंतर माझं आयुष्य खूपच बदललं.

advertisement

8 वर्षांपूर्वी 400 रुपयांची गुंतवणूक, आता महिन्याला 1 लाख रुपयांची उलाढाल, धाराशिवमधील तरुणाने करुन दाखवलं!, VIDEO

आयुष्याकडे पाहायची दृष्टी बदलली आणि त्याचबरोबर आयुष्यातल्या प्रश्नांना सामोरे जाण्याकरता एक नवीन बळ यायला लागलं. मग 1998 मध्ये मी कॉलेज सोडून संपूर्णपणे रेकी शिकवण्यावर लक्ष केंद्रित केले आणि संपूर्ण वेळ लोकांना रेकी शिकवायला सुरुवात केली. या प्रवासात आजपर्यंत सुमारे 25 हजारांहून अधिक लोकांची आयुष्य मी बदलू शकण्यात यशस्वी झाले आहे.

advertisement

एकाहून सुंदर अशी नथ, तेही अगदी फक्त 50 रुपयांपासून, मुंबईतील हे मार्केट आहे भारी ऑप्शन, VIDEO

या प्रवासामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे माणसाला अनेक गोष्टी शिकवल्या जातात. पण यशस्वी कसे व्हायचे, हे कधीच शिकवलं जात नाही. त्यामुळे जसे मी रेकी शिकवून लोकांना औषध मुक्त करते. तसेच लोकांना यशाच्या मार्गावर चालण्यासाठी योग्य रस्ता दाखवण्याचाही निर्णय मी घेतला. यासाठी 2013 मध्ये मी मल्टिव्हर्सिटी ऑफ सक्सेस या नावाची संस्था चालू केली. आज मल्टिव्हर्सिटी ऑफ सक्सेस हे एक ऑनलाईन पोर्टल आहे. यावरुन कुणीही, कुठूनही आपल्याला हवे ते प्रशिक्षण ऑनलाईन घेऊ शकतो.

advertisement

थोडक्यात मानसशास्त्र शिकवायला सुरुवात केली. त्याचबरोबर होमिओपॅथी मेडिसिन आणि लॉ या दोन्हीच्या पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीज पण मिळवल्या आणि त्याचबरोबर विनाऔषध उपचार पद्धतीने लोकांना स्वस्त राहायला कशी मदत करायची ते दाखवत आता मी समाजाला सकारात्मक यशस्वी आयुष्य कसं जगायचं आणि स्वतःचा सर्वांगीण विकास कसा साध्य करून घ्यायचा, हे दाखवत असते, अशी माहितीही त्यांनी दिली. त्यांचा हा प्रवास निश्चितच इतरासांठी प्रेरणादायी आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
सकारात्मक, यशस्वी आयुष्य कसं जगावं, याचे धडे देणारी महिला; 25 हजार लोकांना केलं प्रेरित, कोण आहेत डॉ. रेखा काळे?, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल