पवईतील महावीर क्लासिक नावाची इमारत आहे, या इमारतीत रा नावाचा स्टुडिओ आहे. या स्टुडिओमध्ये रोहित आर्याने १७ जणांना बंदी ठेवलं होतं. या स्टुडिओमध्ये प्रोडक्शन हेड असलेला रोहन आहेर याने स्टुडिओची काच तोडून मुलांना वाचवण्यास मदत केली. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी जेव्हा रोहन आहेर यांच्याकडे विचारणा केली असता त्याने धक्कादायक माहिती दिली.
रोहित आर्यासोबत मी १४ वर्षांपासून काम करत होतो. रोहितने स्टु़डिओमध्ये मागील ५ दिवसांपासून मुलांचं ऑडिशन घेतलं होतं. या ठिकाणी अपहरणाचा सेट उभा केला होता, असं रोहन आहेर याने सांगितलं. तसंच, या प्रकरणी पोलिसांनी जास्त बोलण्यास मनाई केली आहे. फक्त मुलांना वाचवताना काच फोडली, तेव्हा माझ्या हाताला दुखापत झाली होती. पोलिसांनी पुढील गोष्टी बाहेर न बोलण्यास सांगितलं आहे. जेव्हा सगळ्याा कायदेशीर गोष्टी पूर्ण होतील, तेव्हा सगळं सांगणार, असंही रोहनने सांगितलं.
advertisement
रोहितला केसरकरांशी होतं बोलायचं?
रोहित आर्याच्या तावडीतून स्टुडिओमध्ये पोलिसांनी जेव्हा रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं होतं. त्याआधी त्याने एक व्हिडीओ शेअर केला होता. त्याला पैसे नको होते. फक्त त्याला त्याच्या प्रश्नाची उत्तरं हवी होती. पोलिसांनी रोहितशी संवाद साधला. फोनवर तब्बल १ तास बोलणं झालं होतं. रोहितला दिपक केसरकर यांच्याशी बोलायचं होतं, अशी माहिती आता समोर आली आहे.
मनोरुग्ण होता तर सरकारी काम कसं दिलं?
दरम्यान, विरोधकांनी या प्रकरणी शिवसेनेचे नेते आणि माजी शालेय शिक्षम मंत्री दिपक केसरकर यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, रोहित आर्याने जो प्रकार केला तो निदनिय आहे. १७ निरागस मुलांना डांबून ठेवणारा रोहित आर्यापासून मुलांना वाचवलं याबद्दल पोलिसांचं अभिनंदन करतो. हा रोहित आर्या मनोरुग्ण असल्याचे सांगितले जातं. जर तो मनोरुग्ण होता तर त्याला शालेय शिक्षण विभागाचे स्वच्छता मॉनिटर सुंदर शाळा या योजनेचे काम कसं दिलं? त्याचे दोन कोटींचे बिल थकवले आहे हे तो सतत सांगत होता. या घटनांचे गांभीर्य सरकारच्या लक्षात येणार आहे की नाही? ऐपत नाही तर काम का करून घेत आहेत? राज्य कंगाल केलं आहे आणि याचे खापर दुसऱ्यावर फोडत आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
