SBI मध्ये अधिकारी होण्याची संधी
भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.bank.in ला भेट द्यावी. सुरुवातीला अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 डिसेंबर 2025 होती. मात्र अनेक उमेदवारांना तांत्रिक अडचणी येत असल्याने स्टेट बँकेने ही तारीख वाढवून 10 जानेवारी 2026 केली आहे.
advertisement
44 लाखांचे पॅकेज अन् 996 पदांची भरती
या भरती अंतर्गत एकूण 996 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये VP Wealth, AVP Wealth आणि Customer Relationship Executive या पदांचा समावेश आहे. प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
VP Wealth पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे आणि किमान 6 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. AVP Wealth पदासाठी ग्रॅज्युएशनसह रिलेशनशिप मॅनेजर म्हणून 3 वर्षांचा अनुभव असावा. तर Customer Relationship Executive पदासाठी केवळ ग्रॅज्युएशन पात्रता ठेवण्यात आली आहे.
पगाराच्या बाबतीतही ही भरती आकर्षक आहे. VP Wealth पदासाठी सुमारे 44.70 लाख रुपये, AVP Wealth पदासाठी 30.20 लाख रुपये, तर Customer Relationship Executive पदासाठी 6.20 लाख रुपये वार्षिक पॅकेज दिले जाणार आहे.या पदांसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीद्वारे होणार आहे. त्यामुळे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ही संधी नक्कीच गमावू नये.
