मुंबई - महाराष्ट्रातील अंधेरी-पूर्व विधानसभा जागेसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान झाले. यानंतर आज मतमोजणी झाली. यामध्ये यावेळी महायुतीने अंधेरी-पूर्व विधानसभेसाठी मुरजी पटेल (काका) यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत त्यांनी 25 हजार 733 मतांनी विजय मिळवला आहे. यानंतर अंधेरी येथील कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात हा विजयोत्सव साजरा केला.
महाराष्ट्रातील अंधेरी-पूर्व विधानसभा जागेसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान झाले. यावेळी महायुतीने अंधेरी-पूर्व विधानसभेसाठी मुरजी पटेल (काका) यांना उमेदवारी दिली होती. तर महाविकास आघाडीतील ऋतुजा रमेश लटके यांना उमेदवारी दिली होती. यामध्ये आजच्या निकालानुसार मुरजी पटेल यांचा 25 हजार 733 मतांनी विजय झाला आहे. तर ऋतुजा रमेश लटके यांचा पराभव झाला आहे.
advertisement
त्यांच्या या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले. ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये ही थेट लढत होती. यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेने बाजी मारली. त्यांच्या या विजयानंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे. सकाळपासूनच मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी याठिकाणी झाली असून मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
पुण्यात लाडक्या बहिणींच्या वतीने महायुतीचा विजय जल्लोषात साजरा, VIDEO
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. भाजप 132 जागांवर तर राष्ट्रवादी 40 शिवसेना 52 जागांवर आघाडीवर आहे. अर्ध्याहून अधिक निकाल जवळपास हाती आले आहेत. मुंबई, उपनगर आणि काही ठराविक ठिकाणचे निकाल अजूनही बाकी आहेत. राज्यात महायुतीला सर्वाधित मतं मिळाली आहेत.