मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी लहानगी तिच्या कुटुंबीयांसह इमारतीच्या बाहेरून जात असताना, त्या ठिकाणी तैनात असलेला वॉचमन मद्यधुंद अवस्थेत होता. त्याने अचानक त्या मुलीकडे अश्लील हावभाव केले. हा प्रकार पाहणाऱ्या स्थानिक रहिवाशांनी तत्काळ हस्तक्षेप करत वॉचमनला पकडले आणि संतापाच्या भरात त्याला बेदम मारहाण केली.
नेमकं काय आहे व्हिडीओमध्ये?
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला असून, त्यामध्ये महिला आणि नागरिक संतापाने आरोपीला मारहाण करताना स्पष्ट दिसतात. व्हिडिओत काही महिलांचा आवाज येत असून , ती फक्त तीन ते चार वर्षांची मुलगी आहे आणि हा तिची छेड काढत होता. या संतापजनक दृश्यांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.
advertisement
कठोर कारवाईची मागणी
या घटनेमुळे परिसरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, निवासी भागातील सुरक्षेच्या प्रश्नांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले जात आहे. निष्पाप बालिकेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा प्रकार पोलिस आणि सोसायटी प्रशासनासाठीही गंभीर इशारा ठरत आहे. नागरिकांनी अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.