सिद्धिविनायक मंदिरात श्रींच्या मूर्तीला सिंदूरलेपन करण्यासाठी मंदिर प्रशासनानं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सिद्धिविनायक मंदिर आजपासून 5 दिवस बंद राहणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे तुम्ही सिद्धिविनायकाच्या दर्शन घेण्यासाठी काही नियोजन करत असाल तर सध्या ते करता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
चक्क 1 रुपयात मिळतोय दागिना, मुंबईतील या मार्केटला द्या भेट
advertisement
प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक म गणपती मंदिरातील श्रीच्या मूर्तीला सिंदूरलेपन करण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवार ३ जानेवारी ते रविवार ७ जानेवारी या कालावधीत भाविकांसाठी श्रीच्या मूर्तीचे प्रत्यक्ष दर्शन बंद असणार आहे. त्याऐवजी श्रीच्या प्रतिमेचे दर्शन भाविकांना दिले जाणार आहे. सोमवारी दुपारी १ वाजल्यापासून नेहमीप्रमाणे गाभाऱ्यातून भाविकांना श्रींचे दर्शन देण्यात येणार आहे.