पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, हा रात्रकालीन ब्लॉक 11:55 ते 02:55 दरम्यान अप जलद मार्गावर आणि रात्री 01:30 ते पहाटे 04:30 दरम्यान डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉकमुळे विरार- भरूच मेमू ट्रेन 15 मिनिटे उशिराने धावेल आणि विरार स्थानकावरून पहाटे 04:35 च्या ऐवजी पहाटे 04:50 वाजता सुटेल. या ब्लॉकचा कोणत्याही लोकलवर परिणाम होणार नाही. सर्व पश्चिम रेल्वेवरील लोकल रात्री आणि सकाळी आपआपल्या वेळेत धावतील.
advertisement
पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक असल्यामुळे कोणत्याही गाड्यांवर त्याचा फारसा परिणाम पडलेला दिसणार नाही. पश्चिम रेल्वेवरील वसई रोड ते वैतरणा स्थानकादरम्यान फास्ट मार्गावर अप आणि डाऊन मार्गावर काही कामांसाठी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मेगाब्लॉकच्या काळात जलद मार्गावर रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी शुक्रवारी आणि शनिवारच्या मध्यरात्री म्हणजे, 22 नोव्हेंबर रोजी सहा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रात्रकालीन ब्लॉक फक्त पश्चिम रेल्वे मार्गावरच असणार आहे. इतरत्र कोणत्याही मार्गावर हा ब्लॉक नसणार आहे.
