सोलापूर-मुंबई-इंदूर असा असेल नवा हवाई मार्ग
सुरु होत असलेली ही विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस चालणार असून सोमवार, बुधवार आणि गुरुवार या दिवशी प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. सोलापूर आणि इंदूर या दोन महत्त्वाच्या शहरांमधील अंतर आता हवाई मार्गाने कमी वेळेत पार करता येणार असल्याने व्यापारी, व्यावसायिक, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य प्रवाशांसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे.
advertisement
कसे असेल नवीन वेळापत्रक?
उद्यापासून सोलापूर-मुंबई-इंदूर अशी ही विस्तारित विमानसेवा सुरू होत आहे. वेळापत्रकानुसार सोलापुरातून दुपारी 2.50 वाजता विमान उड्डाण घेईल. सुमारे 1 तास 5 मिनिटांच्या प्रवासानंतर दुपारी 3.55 वाजता हे विमान मुंबईत पोहोचेल. मुंबई विमानतळावर सुमारे 45 मिनिटांचा थांबा घेतल्यानंतर दुपारी 4.35 वाजता विमान इंदूरसाठी रवाना होईल. त्यानंतर संध्याकाळी 5.50 वाजता विमान इंदूर विमानतळावर पोहोचणार आहे.
सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने ही विमानसेवा महत्त्वाची मानली जात असून भविष्यात आणखी शहरांशी हवाई संपर्क वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
