दरवर्षीप्रमाणे, फेब्रुवारी ते मार्च 2026 दरम्यान या परीक्षा राज्यातील सर्व नऊ विभागीय मंडळांत एकाच वेळी पार पडणार आहेत.
बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारीपासून
इयत्ता बारावीची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार आहे. त्यापूर्वी 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2026 दरम्यान विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षा देखील याच कालावधीत पार पडतील.
advertisement
दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारीपासून
दहावीची लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार आहे. तर 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2026 दरम्यान प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा होणार आहेत. शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र आणि गृहशास्त्र या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षाही याच काळात घेण्यात येतील.
राज्यातील नऊ विभागांत परीक्षा
या परीक्षा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणार आहेत. शिक्षण मंडळाने यासंदर्भातील सर्व आवश्यक तयारीला सुरुवात केली असून शाळांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.






