एसटी बसने लांब व मध्यम पल्ल्याचा (150 किमीपेक्षा जास्त) प्रवास करण्यासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पूर्ण तिकीटधारी (सवलतधारक प्रवासी वगळून) प्रवशांना तिकीट दरात 15 टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे. विशेष म्हणजे या योजनेची सुरुवात 1 जुलैपासून करण्यात येत आहे. या सोयीचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन परिहवन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
advertisement
Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसाठी खूशखबर! पंढरीच्या वारीसाठी 3 स्पेशल ट्रेन, संपूर्ण वेळापत्रक
त्या प्रवाशांसाठी योजना
कमी गर्दीच्या हंगामात लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी परिवहन विभागाने खास योजना जाहीर केलीये. त्यानुसार आगाऊ आरक्षण केल्यास तिकीटात 15 टक्क्यांची सूट देण्यात येणार आहे. एसटीच्या 77 व्या वर्धापन दिनी म्हणजेच 1 जून रोजी सरनाईक यांनी याबाबत घोषणा केली होती. त्यानुसार ही योजना 1 जुलैपासून लागू करण्यात येत आहे. ही योजना केवळ पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच उपलब्ध असेल.
ई-शिवनेरीच्या प्रवाशांना सवलत
मुंबई-पुणे मार्गावर एसटीच्या ई-शिवनेरी बस धावतात. या बसमधून प्रवास करणआऱ्या आणि पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना देखील या योजनेचा लाभ घेता येईल. आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर जाऊन किंवा एसटीचे अधिकृत संकेतस्थळ आणि मोबाईल ॲपद्वारे तिकीट आरक्षित केल्यास या योजनेचा लाभ मिळेल.
आषाढी वारी, गणेशोत्सवातही लाभ
आषाढी एकादशी व गणपती उत्सवाच्या काळात देखील प्रवाशांना आगाऊ आरक्षण योजनेचा लाभ घेता येईल. आषाढी वारीला राज्यभरातून भाविक पंढरपूरला येतात. तेव्हा नियमित बसचे आरक्षण प्रवाशांनी केल्यास त्यांना तिकीट दरात 15 टक्के सवलत मिळेल. तसेच गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्यांना देखील ही योजना लाभदायी ठरणार आहे. 1 जुलैपासून ही योजना सुरू होत आहे.