Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसाठी खूशखबर! पंढरीच्या वारीसाठी 3 स्पेशल ट्रेन, संपूर्ण वेळापत्रक

Last Updated:

Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी पंढरीला येणाऱ्या भाविकांसाठी खूशखबर आहे. मध्य रेल्वे आणखी 3 विशेष रेल्वे चालवणार आहे.

Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसाठी खूशखबर! पंढरीच्या वारीसाठी 3 स्पेशल ट्रेन, संपूर्ण वेळापत्रक
Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसाठी खूशखबर! पंढरीच्या वारीसाठी 3 स्पेशल ट्रेन, संपूर्ण वेळापत्रक
पंढरपूर : पंढरीच्या वारीसाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर परराज्यातून देखील वारकरी, भाविक येत असतात. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने मोठा निर्णय घेतला असून वारकऱ्यांच्या सोयीसाठी विशेष रेल्वे चालवणार आहे. मध्ये रेल्वेने देखील विठुरायाच्या दर्शनासाठी आणखी तीन एकरी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याच विशेष गाड्यांचं संपूर्ण वेळापत्रक जाणून घेऊ.
मध्य रेल्वेने आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर 3 रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पुणे-मिरज, मिरज-नागपूर आणि मिरज – लातूर या तीन गाड्यांचा समावेश आहे. यातील मिरज-लातूर ही गाडी 6 जुलै रोजी आणि इतर विशेष गाड्या 8 जुलै रोजी चालवल्या जातील.
advertisement
विशेष गाड्यांचं वेळापत्रक
मिरज ते लातूर विशेष रेल्वे
मिरज – लातूर (गाडी क्रमांक 01409) ही विशेष रेल्वे 6 जुलै 2025 रोजी चालवण्यात येईल. या दिवशी ही गाडी मिरज रेल्वे स्थानकावरून सकाळी नऊ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 7 वाजून 20 मिनिटांनी ही गाडी आपल्या गंतव्यस्थानी म्हणजेच लातूर रेल्वे स्टेशनवर पोहोचेल. ही गाडी या प्रवासादरम्यान आगर, कवठे महांकाळ, ढालगांव, सांगोला, पंढरपूर, मोडनिंब, कुर्डूवाड, शेंद्री, बार्शी, पांगरी, धाराशिव, येडशी, कळंब, ढोकी, मुरूड, औसा रस्ता आणि हरंगुळ अशा महत्त्वाच्या स्टेशनवर थांबा घेणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
advertisement
पुणे ते मिरज विशेष रेल्वे
श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी पुणे – मिरज विशेष रेल्वे (गाडी क्रमांक 01413) ही गाडी 8 जुलै 2025 रोजी सकाळी 7 वाजता पुणे रेल्वे स्थानकावरून रवाना होईल आणि दुपारी 12.30 वाजता मिरज रेल्वे स्थानकावर पोहोचेल. मध्य रेल्वेच्या माध्यमातून ही एकेरी विशेष गाडी लोणंद, सातारा, कराड, किर्लोसकरवाडी आणि सांगली या मार्गाने चालवली जाईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
advertisement
मिरज ते नागपूर विशेष रेल्वे
आषाढी वारीसाठी मिरज – नागपूर एकेरी विशेष (क्रमांक 01213) 8 आठ जुलै 2025 रोजी चालवली जाईल. ही गाडी मिरज रेल्वे स्थानकातून दुपारी 10 वाजून 55 मिनिटांनी सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ही गाडी साडेबारा वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. या प्रवासादरम्यान ही गाडी या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार असल्याची माहिती आहे. ही गाडी श्रीक्षेत्र पंढरपूर सहित पश्चिम महाराष्ट्र, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव सहित उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेईल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसाठी खूशखबर! पंढरीच्या वारीसाठी 3 स्पेशल ट्रेन, संपूर्ण वेळापत्रक
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement