TRENDING:

बदलापूर ते वांगणी दरम्यान धावत्या एक्सप्रेसवर दगडफेक, डोळ्यावर बसला मार; प्रवासी गंभीर जखमी

Last Updated:

एक दगड थेट डब्याच्या खिडकीतून आत तौशिफ यांच्या डोळ्याला जाऊन लागला. यात ते गंभीर जखमी झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : दादरहून हुबळीच्या दिशेने जाणाऱ्या एक्सप्रेस रेल्वेवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेनं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ही धक्कादायक घटना १२ ऑक्टोबर रोजी बदलापूर ते वांगणी दरम्यान घडली. या घटनेत गाडीतून प्रवास करणारा तौशिफ इतरवाड (वय 19, रा. बेळगाव) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
News18
News18
advertisement

प्राथमिक माहितीनुसार, तौशिफ इतरवाड हा जनरल डब्यातून प्रवास करत होता. दादरहून सुटलेली एक्सप्रेस बदलापूर स्थानक ओलांडून वांगणीच्या दिशेने जात असताना अचानक धावत्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. त्यातील एक दगड थेट डब्याच्या खिडकीतून आत तौशिफ यांच्या डोळ्याला जाऊन लागला. यात ते गंभीर जखमी झाला. तत्काळ सहप्रवाशांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना माहिती दिल्यानंतर त्यांना साताऱ्याच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

advertisement

'या' कारणासाठी केली दगडफेक 

घटनेनंतर कर्जत रेल्वे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळाजवळील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आणि स्थानिकांच्या मदतीने पोलिसांना एका संशयित अल्पवयीन मुलाचा ठावठिकाणा मिळाला. चौकशीदरम्यान त्या मुलानेच दगडफेक केल्याची कबुली दिली आहे. आरोपी वांगणी परिसरातील रहिवासी असून त्याची चौकशी केली असता केवळ मजेसाठी दगडफेक केल्याचं त्याने सांगितलं, अशी माहिती पोलिसांनी दिली.

advertisement

कठोर कारवाईची मागणी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याचा धोका? आहारात हे पदार्थ करा समावेश
सर्व पहा

सदर अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी प्रवाशांच्या सुरक्षेबाबत अधिक दक्षता घेण्याचा निर्णय घेतला असून, बदलापूर–वांगणी या रेल्वे पट्ट्यात गस्त वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत .  दरम्यान, वारंवार रेल्वे गाड्यांवर दगडफेकीच्या घटना घडत असल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात येत आहे. अशा घटनांवर कठोर कारवाई करून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासनाने अधिक प्रभावी पावलं उचलण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
बदलापूर ते वांगणी दरम्यान धावत्या एक्सप्रेसवर दगडफेक, डोळ्यावर बसला मार; प्रवासी गंभीर जखमी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल