धस यांनी जे काही वक्तव्य केले त्याचा निषेध करण्यासाठी मी इथे आली आहे. गेली अनेक दिवस मी हे सर्व शांतपणे सहन करत आहे. मात्र माझी शांतता म्हणजे मुकसंमती आहे असे नाही. कलाकारांची शांतता म्हणजे हतबलता आहे, असे प्राजक्ताने सांगितले. मी शांत बसले कारण मला चिखलफेकीत पडायचे नव्हते.
Prajakta Mali Press Conference: पत्रकार परिषदेआधी प्राजक्ता रडली? म्हणाली, "जेव्हा आपण गप्प बसतो..."
advertisement
ही विषय इतकी खोटी आहे ज्याला काही आधार नाही. एका कार्यक्रमात सत्कार करत असताना आमची झालेली भेट आणि तेव्हा काढलेला फोटो त्यामुळे मी यात पडले नाही. या काळात माझ्या कुटुंबियांनी आणि चित्रपट क्षेत्रातील मित्रांनी साथ दिल्याचे प्रजक्ताने सांगितले.
आज ही वेळ येते ही नामुष्की आहे. आज एक लोकप्रतिनिधी यावर बोलतात त्यामुळे मला बोलावे लागते. धस त्यांनी असे वक्तव्य केल्यामुळे मला समोर यावे लागले. एखादा लोकप्रतिनिधी असे बोलतो तेव्हा ते गंभीर होते.
तुमच्या राजकारणात तुम्ही आम्हाला का आणता असा प्रश्न यावेळी प्राजक्ता माळीने विचारला. बीडमध्ये कधी पुरुष कलाकार गेला नाही का? फक्त महिला कलाकार जातात का? असा सवाल तिने उपस्थित केला. पण धस यांनी तसे केले नाही. त्यांनी स्वत:चा टीआरपी वाढवण्यासाठी, स्वत:च्या फायद्यासाठी अनेक महिलांची नावे घेतली. एका फोटोवरून तुम्ही कोणाबद्दल काहीही बोलणार का? अशा प्रकारचे वक्तव्य करुन तुम्ही स्वत:ची मानसिकता दाखवता असे तिने सांगितले.
तुमच्या राजकारणासाठी सिने क्षेत्रातील महिलांचा वापर करू नका, अशी विनंती प्राजक्ताने केली. या प्रकरणी आपण मुख्यमंत्र्यांशी फोनवरून बोलोल असून भेटीसाठी वेळ मागितली आहे. मुख्यमंत्र्यांना मी उद्या भेटणार असल्याचे प्रजाक्ताने सांगितले.
राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचे नाव घेतले होते. दरम्यान प्राजक्ता ताईंबद्दल मी काहीही चुकीचे वक्तव्य केले नाही. त्यांना कुठेही तक्रार करायची असेल तर त्या करू शकतात अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली आहे.
