TRENDING:

Thane Drug Seizure: ठाणे क्राइम ब्रँचकडून बंगालमधून आलेल्या चरस तस्कराला बेड्या, 5 कोटींचं चरस हस्तगत

Last Updated:

पश्चिम बंगालमधून चरसची विक्री करण्यासाठी आलेल्या तस्कराला ठाणे गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पश्चिम बंगालमधून चरसची विक्री करण्यासाठी आलेल्या तस्कराला ठाणे गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. शनवर अली (38) असे या तस्कराचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी 5 कोटी 50 लाखांचे चरस जप्त केले आहे. त्याने हे चरस एका नेपाळी व्यक्तीकडून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ठाणे पोलिस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत असताना पोलिसांनी ड्रग्ज तस्कराला अटक केली आहे. त्याप्रमाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुढील तपास सुरू केला.
Thane Drug Seizure: ठाणे क्राइम ब्रँचकडून बंगालमधून आलेल्या चरस तस्कराला बेड्या, 5 कोटींचं चरस हस्तगत
Thane Drug Seizure: ठाणे क्राइम ब्रँचकडून बंगालमधून आलेल्या चरस तस्कराला बेड्या, 5 कोटींचं चरस हस्तगत
advertisement

पश्चिम बंगालमधून मुंबई- ठाण्यात विक्री करण्यासाठी आणलेले पाच किलो चरस ठाणे गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने ठाण्याच्या माजीवडा येथे पकडले. चरसची तस्करी करणाऱ्या एकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली. दरम्यान, अटकेतल्या तस्कराचे नेपाळ कनेक्शन समोर आले असून त्याबाबत पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ठाण्याच्या माजीवडा येथे एक जण त्याच्या साथीदारांसह चरस अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांना मिळाली होती. ही माहिती मिळताच युनिट पाचच्या पथकाने माजीवडा परिसरात सापळा लावला.

advertisement

त्या सापळ्याच्या माध्यमातूनच गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या सापळ्यामध्ये, पश्चिम बंगालचा रहिवाशी असलेला शनवर अली (38) याच्याकडून पोलिसांनी 5 कोटी 50 लाखांचा चरस जप्त केला आहे. तपासादरम्यान, शनवरने चरस एका नेपाळी व्यक्तीकडून आणल्याचे पोलिसांना तपासात निष्पन्न झाले आहे. शनवरच्या संपर्कात नेपाळमधील काही ड्रग्ज तस्कर संपर्कात असल्याचे समोर आले, त्याने हे ड्रग्ज नेपाळमधून कोलकात्यामार्गे ठाणे- मुंबईमध्ये आणल्याचा पोलिसांना संशय आहे. ड्रग्ज तस्करी प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात पुन्हा उलटफेर, कांदा आणि मक्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे व जगदीश गावित यांच्या पथकाने सापळा रचत शनवरच्या मुसक्या आवळल्या. त्याची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्याकडून 505 ग्रॅम वजनाचे दहा पाकीट चरस मिळाले. तो एवढ्या मोठ्या प्रमाणात चरस कोणाला विक्री करण्यासाठी आला होता? हे मोठे रॅकेट असल्याचा अंदाज वर्तवत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. अटकेतल्या आरोपीने या पूर्वी देखील चरसची तस्करी केली आहे का? तो कोणाला हे अमली पदार्थ विकणार होता का ? याचा पोलिस तपास करीत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Thane Drug Seizure: ठाणे क्राइम ब्रँचकडून बंगालमधून आलेल्या चरस तस्कराला बेड्या, 5 कोटींचं चरस हस्तगत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल