ठाणे घोडबंदर राज्य मार्ग 84 या मार्गावर गायमुख नीराकेंद्र, काजूपाडा ते फाऊंटन हॉटेलपर्यंत ग्राऊटींगचे आणि मास्टिक असफाल्टचे काम हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे उद्या रविवारी 7 डिसेंबर मध्यरात्री 12:01 ते 11:59 वाजेपर्यंत काम हाती घेण्यात आले आहे. वाहतुकीत बदल झाल्याची माहिती, ठाणे शहर वाहतुक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी याबाबतची अधिसुचना जारी केली आहे. मात्र पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडोर, ऑक्सिजन गॅस वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वाहतुकीच्या बदलाचे नियम लागू होणार नाहीत. ठाणे शहर वाहतूक शाखेकडून पर्यायी मार्गांची माहितीही देण्यात आली.
advertisement
मुंबई आणि ठाण्यातून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या सर्व अवजड वाहनांना माजिवडा वाय जंक्शन आणि कापुरबावडी चौकाजवळ प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. या मार्गावरील अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गे वाहतुक करतील. मुंबई- ठाणेकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड अवजड वाहने ही कापुरबावडी जंक्शन जवळुन उजवी कडे वळण घेऊन कशेळी, अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. मुंब्रा- कळवाकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारे सर्व जड अवजड वाहनांना खारेगाव टोल नाका येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.
नाशिककडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारे सर्व जड अवजड वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. नाशिक कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड अवजड वाहनांना मानकोली ब्रिज खालुन, उजवीकडे वळण घेऊन अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जाता येणार आहे, असा पर्यायी मार्ग असेल. तर, सर्व हलक्या वाहनांसाठी गायमुख घाटात ठाणे घोडबंदर वाहिनीवर काम चालू असताना ठाणेकडून घोडबंदरच्या दिशेने जाणारी हलक्या वाहने गायमुख चौकी पासून घोडबंदर ठाणे वाहिनीपर्यंत एकाच मार्गाने जाऊन पुढे फाउंटन हॉटेल समोरील कट मधून इच्छित स्थळी जातील.
