नेमकं घडते काय?
मिरा रोडवर राहणारा 45 वर्षीय बांधकाम व्यावसायिक दोन दिवसांपूर्वी सायंकाळी दहिसरहून घरी जात होता. दहिसर चेक नाका जवळ ट्रॅफिक सिग्नलवर पोहोचल्यावर दोन दुचाकीस्वार त्याच्या कारजवळ आले. त्यांनी गाडीच्या खिडकीवर ठक-ठक केले. चालकाने मदत हवी असे समजून खिडकी खाली केली आणि आरोपींनी त्याचा महागडा मोबाईल फोन पळवून नेला.
advertisement
दुसरी घटना भक्ती वेदांत रुग्णालयाजवळ घडली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला टोळीने लक्ष्य केले आणि कारची काच फोडून आतील रोख रक्कम आणि लॅपटॉप चोरून नेले. काशिमिरा पोलीसांनी दोन्ही घटनांवर अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. त्यांनी सांगितले की घटनास्थळ आणि परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासली जात आहेत आणि लवकरच आरोपी पकडले जातील.
ऑईल गळतीचं नाटक
ही टोळी लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी खिडकीवर ठक-ठक करणे, टायर पंक्चर असल्याचे सांगणे, गाडीची काच फोडणे आणि संधी मिळताच महागड्या वस्तू पळवणे यासारखे प्रकार करते. पोलीस नागरिकांना अशा टोळ्यांपासून सतर्क राहण्याचा सल्ला देत आहेत. वाहन चालकांनी सुरक्षित अंतर ठेवा, खिडकी नीट बंद ठेवा आणि संशयास्पद व्यक्ती पाहिल्यास लगेच पोलीसांना सूचित करा.
