काय म्हणाले उदय सामंत?
ज्यांना जनतेने बेदखल केले त्यांच्या बोलण्याची आम्ही दखल घेणार नाही. हे मनोज जरांगे पाटील यांच्या साक्षीने सांगतो, असा पलटवार मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. दरवाजा उघडा असे आम्ही त्यांना सांगितले नाही. आम्ही जाणार, आम्हाला घेणार असे काही चित्र नाही. उलट शिंदे साहेबांचा दरवाजा अनेकांसाठी उघडा आहे. त्यांचे अनेकजण आमच्याकडे येतील. मतांची सूज त्यांना आली आहे असे दिसते. स्वतः ठाकरेंचे लोक आमच्या संपर्कात आहे. म्हणून ते झाकण्यासाठी असे बोलत असल्याचा टोला सामंत यांनी लगावला.
advertisement
संजय शिरसाठ काय म्हणाले?
उद्धव ठाकरे यांनी आम्ही कुणालाही परत घेणार नाही असं म्हटलं आहे. पण जातंय कोण यादी तर द्या? जिथं पाणी थांबत नाही तिथं कुणी पाणी भरायला जात नाही. तुमच्या कडची लोक इथे येतील, त्यांनी त्यांचे लोक सांभाळावे, असा टोलाही संजय शिरसाठ यांनी लगावला आहे. कसले यांचे सरकार येणार? यांची महाविकास आघाडी टिकणार नाही, असा दावाही संजय शिरसाठ यांनी केला आहे.
वाचा - 'आता प्रभू राम हे भाजपमुक्त झाले', उद्धव ठाकरेंचा सणसणीत टोला
शिवसेना नेत्यांनी घेतील जरांगेंची भेट
मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी संभाजीनगरमध्ये आज राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आणि संभाजीनगरचे पालकमंत्री यांनी जरांगे यांची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. यावेळी त्यांनी आरक्षणासाठी राज्य सरकार काम करत आहे, असे आश्वासन जरांगे यांना दिले.