Uddhav Thackeray: 'आता प्रभू राम हे भाजपमुक्त झाले', उद्धव ठाकरेंचा सणसणीत टोला

Last Updated:

लोकसभा निवडणुकीमध्ये विजयानंतर आज मुंबईमध्ये महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली.

(उद्धव ठाकरे)
(उद्धव ठाकरे)
मुंबई: लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. हा विजय अंतिम नाही तर ही लढाई आता सुरू झाली आहे. हे सरकार किती दिवस चालेल हे दिसेलच पण हे एनडीएचं सरकार आहे. देशातील जनता जागी झाली आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एनडीए सरकारवर टीकास्त्र सोडलं. तसंच, जिथे जिथे रामाचं वास्तव तिथे भाजपचा पराभव झाला आहे, त्यामुळे भाजपमुक्त राम झाला आहे, अशी खोचक टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.
लोकसभा निवडणुकीमध्ये विजयानंतर आज मुंबईमध्ये महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात हजर होते. तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण आदी नेतेही हजर होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं.
महाविकास आघाडीची प्राथमिक बैठक झाली आहे. आगामी निवडणुकीसाठी आम्ही एकत्रच लढवणार आहे. कांद्याच्या निर्णयामुळे भाजपला रडावं लागलं. त्यांनी ज्यांना सोबत घेतलं त्यांच्यामुळे त्यांना रडावं लागलं. मोदींना जनतेनं 10 वर्ष दिले होते. पण यावेळी त्यांची जागा वाचली आहे. आता ते किती दिवस पंतप्रधान राहणार हे माहिती नाही. आता भाजपमुक्त राम झाला आहे. जिथे प्रभू रामाचं अस्तित्व होतं, तिथे भाजप तोंडघशी पडलं आहे, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.
advertisement
'NDA चं सरकार किती दिवस राहील याची गॅरेंटी नाही. मोदी सरकार आता एनडीए सरकार झालं आहे. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई होती. तुमचं मंगळसुत्र चोरून नेतील, म्हैस चोरली जातील हे काय खरं नरेटीव्ह होतं का? असा खोचक सवालही उद्धव ठाकरेंनी भाजपला विचारला.
'2014 पासून मोदींनी मांडलेले सर्व नरेटीव्ह खोटे होते. M फॅक्टरमध्ये मराठी येत नाही का? मोदींनी प्रचारात वापरलं ते खरं नरेटीव्ह होतं का? कित्येक कोटी लोकांनी भाजपच्या विरोधात मतदान केलं. सर्व धर्मियांनी संविधान वाचवण्यासाठी मतदान केलं. महायुतीत तिघंही ओसाड, कुणीही एकत्र नाहीत. जनतेनं धडा शिकवला आता 4 ते 5 महिन्यात जनता ठोस निर्णय घेईल. सहकाऱ्यांमुळे भाजपवर रडण्याची वेळ आली आहे, असंही उद्धव
advertisement
ठाकरे म्हणाले.
मराठी बातम्या/मुंबई/
Uddhav Thackeray: 'आता प्रभू राम हे भाजपमुक्त झाले', उद्धव ठाकरेंचा सणसणीत टोला
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement