मुंबई, 4 सप्टेंबर : जालना येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या लोकांवर लाठीचार्ज झाल्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारची भूमिका स्पष्ट केली. यातून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर टीका केली आहे. विरोधकांना आरोप सिद्ध करण्याचं आव्हानच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. यावर आता उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून उत्तर दिलं आहे.
advertisement
मुख्यमंत्र्यांनीही राजीनामा दिली पाहिजे : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. ठाकरे म्हणाले, संयम फक्त आंदोलकांनी पाळला पाहिजे असं नाही, जर मुख्यमंत्री म्हणत असतील आम्ही लाठ्या कशा मारू? याचा अर्थ एकनाथ शिंदे यांचं सरकारवर कंट्रोल नाही. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही तिथे बसण्याचे त्या क्षमतेचे नाही. तुम्ही सुद्धा राजीनामा दिला पाहिजे. राजीनामा द्या मग माझं कुणी ऐकत नाही असं म्हणा.
आता जी काही डोकी फोडली आहे, त्याचे श्रेय हे टीम वर्क म्हणून स्वीकारलं पाहिजे. मी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला होता. आता दोन फुल एक हाफने सुद्धा राजीनामा दिला पाहिजे. आजपर्यंत निर्घृणपणे सरकार वागलं नव्हतं. हे तीन तिघाडी सरकार आहे, ट्रिपल इंजिन सरकार आहे. कुणीही न्याय हक्कासाठी रस्त्यावर यायचं नाही, माता भगिनी पाहणार नाही, येईल त्याची डोकी फोडू असा प्रकार बारसूमध्ये घडला आणि जालन्यात सुद्धा घडला. हे सरकार वारकऱ्यांवर लाठीचार्ज करतो, हे मला पटत नाही. आता त्यांनी अत्याचार केला, हे सांगता पोलिसांनी आदेश दिला, पोलीस सांगितली लाठ्यांनी मारहाण केली, मग काय लाठ्या बडतर्फ करणार का, तो आदेश ज्यांनी दिली.
वाचा - 'हिंमत असेल तर ते आरोप सिद्ध करून दाखवा, अन्यथा...', अजितदादांचं विरोधकांना ओपन चॅलेंज
मी जातीपाती बघत नाही, मी एक फुल आणि दोन हाफ जर फडणवीस यांना बाजूला काढलं तरी पोलीस त्यांना जुमानात नसेल तर हे सरकार चालवण्याचे कुवतीचे नाही, हे नालायक आहे, असं होतं. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
अजित पवारांना उत्तर
जालन्यात लाठीचार्जसाठी मंत्रालयातून आदेश आले हे सिद्ध करा, असं आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना केलं होतं. यावर बोलताना ठाकरे म्हणाले, असे पुरावे ज्यांनी तुमच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांच्याकडे सुद्धा होते. तरी सुद्धा त्यांनी तुम्हाला सोबत घेऊन उपमुख्यमंत्री केलं ना? आता त्यांच्याकडे भ्रष्टाचाराचे पुरावे मागतील पाहिजे. पुरावे पुरावे म्हणताय, पंतप्रधान मोदी यांनी 70 हजार कोटींचा घोटाळ्याचा आरोप केला होता, आता त्यांच्याकडे पुरावे मागा. जर त्यांचं म्हणणं लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला नाही. तर त्यांचा प्रशासनावर वचक नाही. मी होतो, माझ्यावेळी मराठा समाजाने सुद्धा आंदोलनं केली होती. कोणत्याही आंदोलकांनी माझ्याकडे भेटण्याची वेळ मागितली, त्यावेळी आम्ही वेळ दिला होता. आजचे उपसुद्धा त्यावेळी माझ्यासोबत होते, आम्ही सगळ्यांनी मिळून तोडगा काढला होता, अशीही माहिती ठाकरे यांनी दिली.