Jalna Lathi Charge : 'हिंमत असेल तर ते आरोप सिद्ध करून दाखवा, अन्यथा...', अजितदादांचं विरोधकांना ओपन चॅलेंज

Last Updated:

जालन्यातल्या मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत, यावरून अजित पवार यांनी विरोधकांना ओपन चॅलेंज दिलं आहे.

जालन्यातल्या लाठीचार्जवरून अजित पवारांचं विरोधकांना चॅलेंज
जालन्यातल्या लाठीचार्जवरून अजित पवारांचं विरोधकांना चॅलेंज
मुंबई, 4 सप्टेंबर : जालन्यामध्ये मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनातल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या लाठीचार्जचे पडसाद महाराष्ट्रात उमटल्यानंतर राज्य सरकारकडून तातडीची पावलं उचलण्यात आली. मराठा आरक्षण आणि सुविधा संदर्भात राज्य मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना थेट आव्हान दिलं आहे.
'काहींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, खुशालपणे सांगताय वरतून आदेश आला आहे, जर वरतून आदेश आला हे सिद्ध करून दाखवलं तर आम्ही म्हणाल ते ऐकू, पण विनाकारण समाजात गैरसमज पसरवला जात आहे. कुणी आदेश दिले, चला दूध का दूध पानी का पानी होऊ द्या, आम्ही तिघांनी जर आदेश दिले हे सिद्ध करावं, जर सिद्ध केलं तर राजकारणातून बाजुला होईन, त्यांनी जर सिद्ध केलं नाही तर त्यांनी राजकारणातून बाहेर व्हावं, आहे का हिंमत,' असं चॅलेंज अजित पवारांनी विरोधकांना दिलं आहे.
advertisement
'जनतेला आवाहन आहे, बंद पुकारले, संप पुकारला. एसटी बस जाळल्या जात आहेत. हे कुठेही झालं तरी राज्याचंच नुकसान होत आहे. मराठा आंदोलनं शांततेत झाली, त्याचा सर्वांना आदर्श आहे. सकारात्मक पद्धतीने चर्चा झाली आहे. गिरीश महाजन तिथे गेले, त्यांनी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना तिथे जायला सांगितलं आहे. चर्चा करून निर्णय निघू शकतो, मला आवाहन करायचं आहे, केविलवाणा प्रयत्न आहे, हे महाराष्ट्राला परवडणारं नाही, हा सुसंस्कृती महाराष्ट्र आहे, आंदोलनं थांबवली पाहिजे,' असा आग्रह अजित पवारांनी धरला.
advertisement
'दोन दिवस माझी तब्येत ठीक नव्हती ,आजारी होतो. पण समजगैरसमज पसरवला गेला. अंतरवाली सराटी इथं लाठीचार्ज झाला, तो व्हायला नको होता. असे प्रसंग येतात, राज्याचं हित लक्षात घेऊन भूमिका घ्यायला पाहिजे. पण राजकीय पोळी भाजता येते का, याबद्दल प्रयत्न केले गेले. राजकीय कारकिर्दी पाहिले तर अनेकांना संधी मिळाली. मराठा असो मुस्लिम असो, सगळ्यांनी आरक्षणाची मागणी केली. त्यावेळी प्रत्येक सरकारने प्रयत्न केला. उद्याच्याला निर्णय घेत असताना तो कायद्याच्या दृष्टीने योग्य ठरला पाहिजे', असं अजित पवार म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalna Lathi Charge : 'हिंमत असेल तर ते आरोप सिद्ध करून दाखवा, अन्यथा...', अजितदादांचं विरोधकांना ओपन चॅलेंज
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement