मिळालेल्या माहितीनुसार एका खाजगी कारमधून 3 बॅलेट मशीन एक कंट्रोल मशीन घेऊन जात असल्याची बाब बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना कळताच त्यांनी संबंधित गाडी अडवली.त्यानंतर क्षितीज ठाकूर यांनी घटनास्थळी दाखल होऊन संबंधित गाडीतील बॅलेट मशीन आणि कंट्रोल मशीन बाबत विचारपूस केली होती. यावेळी या मशीन खराब झाल्यामुळे घेऊन जात असल्याचे निवडणूक कर्मचाऱ्याने सांगितले. मात्र बॅलेट मशीन स्ट्रॉग रूममध्ये किंवा स्टोर रूममध्ये ठेवण्याची पद्धत असताना या मशीन्स मतदानाच्या दिवशी असा खाजगी वाहनातून नेली जात असल्याने नागरीकांमध्ये संशय निर्माण झाला होता.
advertisement
दरम्यान या प्रकरणात क्षितीज ठाकूर यांनी संबंधिक कर्मचाऱ्यावर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली होती.मात्र कर्मचाऱ्याला मशीन्सचा रेकॉर्ड आणि अनेक प्रश्नांची योग्य उत्तर देता आली नव्हती. भररस्त्यात हा संपूर्ण प्रकार घडला होता. त्यामुळे घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली होती. तसेच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला होता. या घडनेने नागरीकांमध्ये मोठा संशय निर्माण झाला होता.
वसई विरार मतदान अपडेट
सकाळी ९.३० पर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी- ८.४९%
सकाळी ११.३० पर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी- १९.३४%
दुपारी १.३० पर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी- ३३.००%
दुपारी ३.३० पर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी- ४५.६९%
