वसई महापालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे माजी सभापती अजीव पाटील, प्रशांत राऊत आणि प्रफुल साने हे उमेदवार विजयी ठरले आहेत. यामध्ये अजीव पाटील यांची 291.65 करोड इतकी संपत्ती आहे, तर प्रफुल्ल साने यांची 30 करोड संपत्ती आहे. आणि प्रशांत राऊत यांच्याकडे 1 कोटीची संपती आहे. ठाकूर यांचे हे तीनही श्रीमंत उमेदवारांनी निडणुकीत गुलाल उधळला आहे.
advertisement
प्रभाग 4 मधून बविआचे 4 उमेदवार विजयी
वसई विरार महापालिकेचा पहिला निकाल हाती आला आहे.प्रभाग क्रमांक ४ मधून बहुजन विकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी ठरले आहेत.बहुजन विकास आघाडीच्या माजी सभापती प्रशांत राऊत, अमृता चोरघे, सुमन ममता दुर्गेश, प्रफुल्ल साने आणि अजीव पाटील विजयी झाले आहेत.
उमेदवारांचा तपशील
बविआ : 113
भाजप : 95
शिवसेना शिंदे गट :27
शिवसेना ठाकरे गट : 89
राष्ट्रवादी अजित पवार : 13
एमआयएम : 7
बसपा :14
काँग्रेस :10
वंचित : 12
अपक्ष 167
एकू्ण : 547
