TRENDING:

Vasai Virar Result : हितेंद्र आप्पांचा विषय 'लय हार्ड', 90 जागा जिंकल्या असत्या, फक्त इथं बिघडलं गणित!

Last Updated:

बविआचे तीन आमदार पडल्यानंतर हितेंद्र ठाकूर यांच्यासमोर महापालिका राखण्याचे आव्हान होते. हे आव्हान त्यांनी लिलया पेलवत महापालिका राखत 71 जागा जिंकून आणल्या आहेत. पण हितेंद्र ठाकूर याहून जास्त जागा म्हणजेच जवळपास साधारण 90 जागा जिंकू शकले असते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Vasai Virar Election Result 2026 : वसई विरार महापालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी आपली सत्ता कायम राखली आहे. खरं तर विधानसभा निवडणुकीत बविआचे तीन आमदार पडल्यानंतर हितेंद्र ठाकूर यांच्यासमोर महापालिका राखण्याचे आव्हान होते. हे आव्हान त्यांनी लिलया पेलवत महापालिका राखत 71 जागा जिंकून आणल्या आहेत. पण हितेंद्र ठाकूर याहून जास्त जागा म्हणजेच जवळपास साधारण 90 जागा जिंकू शकले असते. त्यामुळे साधारण 20 जागा आणखी जिंकू शकले असते पण त्या ठिकाणी गणित बिघडल्याने भाजपने बाजी मारली होती.
vasai virar election result 2026
vasai virar election result 2026
advertisement

वसई विरार महापालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने 115 जागांपैकी 71 जागांवर विजय मिळवला तर भाजपला 42 जागा जिंकण्यात यश आले. शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेसने 1 जागा जिंकली होती. या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांची बविआ ही 70 नव्हे तर 90 जागा जिंकू शकली,पण काही ठिकाणी बविआचा निसटता पराभव झाला. त्यामुळे ही प्रभाग नेमकी कोणती होती? हे जाणून घेऊयात.

advertisement

बविआचा 'या' जागांवर निसटता पराभव

Ward No Seat No Reservation Winning Candidate Winner Party Winner Votes Runner-up Candidate Runner-up Party Runner-up Votes Margin
5 5A BCC गौरव वसंत राऊत भारतीय जनता पार्टी 9,121 हार्दिक राऊत बहुजन विकास आघाडी 8,648 473
5 5B General (Women) संजना गणेश भायदे भारतीय जनता पार्टी 9,410 रिताबेन कनुभाई सरवैया बहुजन विकास आघाडी 8,295 1,115
5 5C General (Women) अॅड दर्शना त्रिपाठी कोटक भारतीय जनता पार्टी 9,382 अर्चना नयन जैन बहुजन विकास आघाडी 8,443 939
5 5D General मेहुल अशोक शाह भारतीय जनता पार्टी 9,200 पंकज भास्कर ठाकूर बहुजन विकास आघाडी 8,564 636
6 6A BCC (Women) योगिता गवळी करंजकर भारतीय जनता पार्टी 9,275 ऋषिका रमाकांत पाटील बहुजन विकास आघाडी 8,227 1,048
6 6D General हितेश नरेंद्र जाधव भारतीय जनता पार्टी 8,406 स्वप्निल सुरेश पाटीलला बहुजन विकास आघाडी 7,718 688
15 15B General (Women) रितू चौबे भारतीय जनता पार्टी 8193 विजया विजय तोरणकर बहुजन विकास आघाडी 7514 679
15 15C General योगेश सुरेशप्रताप सिंह भारतीय जनता पार्टी 8021 प्रिन्स अमरबहादूर सिंग बहुजन विकास आघाडी 6813 1208
15 15D General चंद्रकांत लक्ष्मण गोरीवले भारतीय जनता पार्टी 8580 विजय यशवंत घोलप बहुजन विकास आघाडी 7291 1289
17 17A BCC (Women) स्मिता भूपेंद्र पाटील भारतीय जनता पार्टी 10435 शीतल मयुरेश चव्हाण बहुजन विकास आघाडी 9853 582
17 17B General (Women) बबिता देवराज सिंह भारतीय जनता पार्टी 9416 सुविधा संकित माने बहुजन विकास आघाडी 8417 999
17 17C General जयप्रकाश सुरेश वझे भारतीय जनता पार्टी 8961 बालाजी जालिंदर रंजारे बहुजन विकास आघाडी 7828 1133
17 17D General शरद शंकर सुर्वे भारतीय जनता पार्टी 9297 मनिष कमलेशकुमार जोशी बहुजन विकास आघाडी 8366 931
18 18B General (Women) हेमलता नवीन सिंह शिवसेना 9763 सरिता प्रमोद दुबे बहुजन विकास आघाडी 9180 583
18 18C General (Women) ख्याती संदीप घरत भारतीय जनता पार्टी 9494 अमिता कैलास पाटील बहुजन विकास आघाडी 8589 905
21 21A Scheduled Caste विशाल रमेश जाधव भारतीय जनता पार्टी 9714 रुपेश सुदाम जाधव बहुजन विकास आघाडी 9571 143
23 23B BCC महेश सदाशिव सरवणकर भारतीय जनता पार्टी 8965 वंदेश पाटील बहुजन विकास आघाडी 8381 584
23 23C General (Women) निम्मी निपूण दोशी भारतीय जनता पार्टी 9213 गीता आयरे बहुजन विकास आघाडी 7983 1230
23 23D General प्रदिप नरसिंह पवार भारतीय जनता पार्टी 9071 प्रविण सिताराम नलावडे बहुजन विकास आघाडी 7893 1178

advertisement

खरं तर या त्या वरील 19 जागा आहेत. ज्या जागांवर बहुजन विकास आघाडीची भाजपसोबत काँटे की टक्कर झाली होती. विशेष म्हणजे या प्रभागात बविआचा अवघ्या काही मतांनी पराभव झाला आहे. म्हणजे काही मतं जर बविआला मिळाली असती तर या प्रभागात बविआ जिंकून आली असती. त्यामुळे बविआ जरी 71 जागा जिंकून आली असली तरी त्यांना आणखी 19-20 जागा जिंकायची संधी होती, या जागा जिंकून बविआ जवळपास 90 जागा जिंकू शकली असती.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कॅफेतला वेटर झाला आर्मी जवान, आईच्या कष्टाचं केलं सोनं, विकासची BSF मध्ये निवड
सर्व पहा

गेल्या महापालिका निवडणुकीचा निकाल पाहता यंदाच्या निवडणुकीतला विजयाचा आकडा कमीच आहे.गेल्या वेळी बविआने एकट्याने 106 जागा जिंकल्या होत्या, पण यंदा त्यांना 71 जागा मिळाल्या आहेत.त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत बविआला 35 जांगाच नुकसान झालं आहे. तसेच गेल्या निवडणुकीत 1 जागा जिंकणाऱ्या भाजपने यंदा 44 जागा जिंकल्या आहेत.त्यामुळे आता खऱ्या अर्थाने भाजपने महापालिकेत विजय मिळवला आहे पण त्यांना बहुमत गाठला आले नाही.

advertisement

Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
मराठी बातम्या/मुंबई/
Vasai Virar Result : हितेंद्र आप्पांचा विषय 'लय हार्ड', 90 जागा जिंकल्या असत्या, फक्त इथं बिघडलं गणित!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल