वसईच्या समुद्र किनाऱ्यापासून 66 नोटिकल अंतरावर मागील दहा दिवसांपासून समुद्रात गोल रिंगण तयार झाले असल्याचे दिसून आले आहे. यामुळे मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. खरं तर या घटनेचा पहिला व्हिडिओ हा 11 जानेवारीला समोर आला होता.या घटनेनंतर सर्वच यंत्रणा सजग झाल्या होत्या.परंतु या घटनेला सात दिवसाचा अवधी उलटून देखील या गोल रिंगणा रहस्य काय उलगडायला तयार नाही आहे.
advertisement
वसईतील पाचुबंदर येथील 'ओम नमः शिवाय' ही कृष्णा मोरलीखांड्या यांच्या मालकीची मच्छीमार नौका समुद्रात मासेमारीसाठी निघाली होती. पण जीपीएस क्रमांक ३०-१५-५५४, ७१-५८-५७६ याठिकाणी मोठे गोलाकार रिंगण (वर्तुळ) वर्तुळ तयार झाले होते. त्यातून मातकट रंगाचे पाणी वेगाने निघत असल्याचे निदर्शनास आले होते. या रिंगणात दरम्यान बोट या ठिकाणी अडकली होती. नंतर इंजिनाचा वेग वाढवून मच्छीमारांनी बोट बाहेर काढून त्वरित मत्स्य अधिकारी, तटरक्षक, नौदलाला या घटनेची माहिती दिली होती.
या घटनेनंतर मच्छिमार बांधवांनी ती ज्वालामुखी असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कारण पालघर जिल्हा हा भूकंपप्रवण क्षेत्र आहे. दरवर्षी 200 हून अधिक सौम्य भूकंप होतात, म्हणून आपत्ती विभागाकडूनही तपासणी करावी अशी मागणी समुद्र जीव रक्षक जनार्दन मेहेर यांनी केली आहे. मात्र या घटनेची दखल कोणत्याही यंत्रणेने न घेतल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.