BMC निवडणूक लढवण्यावरुन महायुतीमध्ये सध्या धुसफूस चालू असताना आता आणखी एक प्रतिस्पर्धी तयार झाला आहे. BMC साठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सोबत जैन समाज देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. कबुतरखाने बंद करण्याच्या निर्णयावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जैन समुदायाने थेट राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. जैन समाजाकडून जनकल्याण पार्टी पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. हार्दिक हुडिया हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. कबुतरांचा मुद्दा घेऊन जनकल्याण पार्टी सरकारला धारेवर धरणार आहे.
advertisement
आमच्या पक्षाचा मुख्य मुद्दा जनकल्याण आहे. मुक्या जनावरांना त्यांचा हक्क मिळणे. आमच्याकडे मतदार खूप मोठ्या प्रमाणात आहे. आमचा पक्ष नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन पुढे वाटचाल करेल. आमच्या मतदारावर आमचा विश्वास आहे. जे मुंबईच्या हिताची भावना ठेवतात ते नक्कीच आम्हाला मतदान करतील. प्रांतवादाचा वाद हा आहेच नाही. आम्ही सर्व भारत मातेचे मुलं आहोत. आम्ही सर्व भाजपचे मतदार आहोत. मात्र भाजपने कबुतरांच्या बरोबर जो खेळ खेळला, तो खूप घाणेरडा होता. कबुतरांपासून कोणालाही धोका नाही. भाजपला या निवडणुकीत उत्तर द्यावे लागेस, असेही हार्दिक हुंडिया म्हणाले.
नेमकी आता कोणती भूमिका घेणार?
कबूतर हे राष्ट्राच्या शांतीचे प्रतीक आहे. भाजपने कबुतरांच्या सोबत जो खेळ खेळला तो खूप घाणेरडा आहे. याचे भाजपाला या निवडणुकीत उत्तर द्यावा लागणार आहे. आम्ही सर्वजण येणाऱ्या निवडणुकांमध्ये सरकारला या संदर्भात प्रश्न विचारणार आहे. कबुतरखाने बंद करण्यामागे काय रहस्य आहे. मुंबईकरांना याचे उत्तर द्यावे लागणार आहे. मंगल प्रभात लोढा व राहुल नार्वेकर यांच्या भूमिकेकडे आता आमचं लक्ष आहे की ती नेमकी आता कोणती भूमिका घेणार आहेत, असे हार्दिक हुंडिया म्हणाले.
हे ही वाचा :
