भंगार विक्रीतून चक्क पश्चिम रेल्वेने थेट 300 कोटी रुपये कमावले आहेत. भंगार विक्रीमध्ये रेल्वेने वर्कशॉपमधील रूळ, खांब, धातूच्या वस्तू आणि तत्सम गोष्टींची विक्री केली आहे.
पश्चिम रेल्वेच्या ‘शून्य भंगार मोहिम’अंतर्गत मुंबई सेंट्रल, वडोदरा, रतलाम, राजकोट, भावनगर आणि अहमदाबाद या विभागातल्या कारखाना आणि कारशेडमधील भंगार गोळा करून विक्री केली जात आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेला त्यांच्या तिजोरीत भंगार विक्रीतून 2025- 26 या आर्थिक वर्षात आतापर्यंत 302 कोटी रुपयांहून अधिकचा महसूल मिळाला आहे.
रेल्वे मंडळाने निश्चित केलेल्या लक्ष्यापेक्षा साधारण 21 टक्के जास्त प्रमाणात भंगार विक्रीची कामगिरी करण्यात आली आहे. ज्यामुळे भंगार विक्रीची सर्वत्रच चर्चा होते.
भंगार म्हटलं की आपण त्या गोष्टीकडे टाकाऊ वस्तू म्हणूनच पाहतो. मात्र याच भंगार वस्तूने रेल्वेला कोट्यवधींचा नफा करून दिला आहे.
