किती लोकल फेऱ्या?
पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन प्रवाशांच्या सोयीसाठी वेस्टर्न रेल्वेने 12 नव्या एसी लोकल सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. नुकतीच घोषणा करण्यात आली असून अद्याप तारीख समोर आलेली नाही. प्रवाशांचा प्रवास अधिकाधिक गारेगार होण्यासाठी पश्चिम रेल्वेने वातानुकूलित इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (एसी ईएमयू) सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. एकूण 12 एसी लोकल असून ज्या 6 अप आणि 6 डाऊन अशा पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या आहेत. तर, 3 धीम्या अप आणि 3 धीम्या डाऊन तर, 3 जलद अप आणि 3 जलद डाऊन अशा एकूण 12 लोकल धावणार आहेत.
advertisement
संपूर्ण लोकलचा टाईमटेबल
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, नव्याने सुरू केल्या जाणाऱ्या एसी ईएमयू लोकल सेवा 12 कार रॅक वापरून चालवल्या जातील आणि दररोज मुंबई लोकल प्रवाशांना सेवा देण्यासाठी गर्दीच्या वेळी, दुपारच्या वेळी आणि जास्त वर्दळ नसणाऱ्या वेळात या लोकल सेवा चालवल्या जाणार आहेत. अप मार्गाच्या दिशेने, एसी लोकल गोरेगाव, बोरिवली, भाईंदर आणि विरार ते चर्चगेट दरम्यान चालवल्या जाणार आहेत. यामध्ये सहा लोकल फेऱ्यांपैकी तीन जलद सेवा म्हणून आणि तीन स्लो लोकल फेऱ्या म्हणून चालवल्या जाणार आहेत. सर्वात पहिली लोकल अप मार्गावरून गोरेगाव वरून सकाळी 05:14 वाजता सुटेल, तर दुसरी आणि शेवटची अप लोकल गोरेगाव वरून संध्याकाळी 07:06 वाजता सुटेल.
चर्चगेटवरून पहिली लोकल किती वाजता?
डाऊन मार्गावर सुद्धा 6 एसी लोकल चालवल्या जाणार आहे. ज्या 2 जलद मार्गावर आणि 4 धीम्या मार्गावर अशा पद्धतीने चालवल्या जाणार आहेत. चर्चगेटवरून सुटणाऱ्या ह्या लोकल विरार, भाईंदर, बोरिवली आणि गोरेगांव पर्यंत धावणार आहेत. चर्चगेट स्थानकावरून पहिली लोकल सकाळी 06:14 वाजता सुटेल, तर दुसरी आणि शेवटची लोकल रात्री 08:07 वाजता धीम्या मार्गावरून सुटेल.
कोणत्या स्थानकांवरून सुटणार लोकल
विरार- चर्चगेट- विरार- चार फेऱ्या
गोरेगाव- चर्चगेट- गोरेगाव- चार फेऱ्या
बोरिवली- चर्चगेट- बोरिवली- दोन फेऱ्या
भाईंदर- चर्चगेट- भाईंदर- दोन फेऱ्या
चार लोकल सकाळी गर्दीच्या वेळेत धावतील. तर संध्याकाळी गर्दीच्या वेळेत चार लोकल धावतील आणि दुपारी कमी गर्दीच्या वेळात चार लोकल धावतील. दिवसभर संपूर्ण वेळ सुनिश्चित करून अप आणि डाउन सोबतच जलद आणि धीमी अशा दोन्ही मार्गांवर एकूण बारा सेवा चालवल्या जाणार आहेत. बारा डब्ब्यांच्या ह्या लोकल सेवा गर्दीमुळे प्रवाशांच्या दृष्टीने सुरू केल्या आहेत. नवीन लोकल फेऱ्यांमध्ये वाढ केल्यामुळे नोकरदारांचा प्रवास अधिकच सुखकर आणि सोयीस्कर होण्याची शक्यता आहे.
