पश्चिम रेल्वेकडून तिकीटावर मोठी सवलत
या उपक्रमाचा उद्देश प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देणे तसेच प्रवास अधिक सुरळीत करणे तसेच रेलवन अॅपच्या प्रचारासाठी देखील ही जनजागृती मोहीम सुरू केली आहे. स्थानकांवर तिकीट काढणारे कर्मचारी, तिकीट तपासणी कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांमार्फत अॅपची माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचवली जात आहे. प्रमुख स्थानकांवर विशेष मदत खिडक्या उभारण्यात आल्या असून स्थानकांवर फलके आणि पत्रकेही प्रदर्शित केली जात आहेत. तसेच सोशल मीडियाद्वारेही रेलवन अॅपबाबत माहिती नियमित प्रसारित केली जात आहे.
advertisement
सध्या यूटीएस अॅप वापरणारे प्रवासी सहजतेने रेलवन अॅपवर जाऊ शकतात आणि त्यावरून फलाट तिकीट तसेच इतर सेवा वापरू शकतात. प्रवाशांना आवाहन करण्यात आले आहे की रोख रकमेविना ऑनलाइन तिकीट खरेदी करा आणि आर-वॉलेट वापरल्यास अतिरिक्त 3% लाभ मिळवता येईल.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले की “रेलवन अॅपद्वारे प्रवास अधिक स्मार्ट, सुरक्षित आणि आरामदायी बनवण्याचा हा प्रयत्न आहे. प्रवाशांनी तिकीट खरेदी करताना डिजिटल पद्धतीचा वापर करावा.” या मोहीमेमुळे प्रवाशांना झटपट आणि सुरळीत तिकीट सुविधा मिळेल तसेच कॅशलेस व्यवहाराला चालना मिळेल.
