TRENDING:

Railway Ticket: ट्रेन तिकीट बुकिंगचा नवा पॅटर्न! पश्चिम रेल्वेने उचलले मोठे पाऊल; काय आहे प्लॅन?

Last Updated:

Railway Ticket: दिवाळी आणि छठ पर्वाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. आता मुंबई सेंट्रलसह काही स्टेशनवर एसटीप्रमाणे तिकीट मिळणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: दिवाळी आणि छटपूजेसाठी मोठ्या संख्यने प्रवासी रेल्वेने गावी जातात. त्यामुळे रेल्वेला मोठी गर्दी असते. अनेकांना लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी आरक्षण मिळत नाही. त्यामुळे ते अनारक्षित तिकिटावर प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर तिकिटासाठी रांगा लागतात. याच पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने मोठा निर्णय घेतला असून प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
आता एसटी सारखं मिळणार ट्रेनचं तिकीट, पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय, नवा प्लॅन काय?
आता एसटी सारखं मिळणार ट्रेनचं तिकीट, पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय, नवा प्लॅन काय?
advertisement

पश्चिम रेल्वेने एसटी बस प्रमाणे तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे तिकीट नोंदणी कार्यालयातील कर्मचारीच आता प्रवाशांजवळ जाऊन दिकीट देतील. या उपक्रमामुळे बुकिंग कर्माचीर प्रवासी थांबण्याच्या ठिकाणी मशिनच्या माध्यमातून तिकीट देतील. या मशिनमध्ये रोख रक्कम आणि ऑनलाईन पेमेंट अशा दोन्ही प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत.

मध्य रेल्वेचं दिवाळी गिफ्ट! पुणे, मुंबईतून धावणार विशेष रेल्वे, कधी आणि कुठे? पाहा वेळापत्रक

advertisement

कोणत्या स्थानकावर सुविधा?

सध्या पश्चिम रेल्वेची ही सुविधा मुंबई सेंट्रल विभागातील मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस आणि बोरिवली या स्थानकांवर सुरू राहील. त्यानंतर सुरत आणि उधना येथील स्थानकांवर देखील ही सुविधा उपलब्ध होईल. वांद्रे टर्मिनस येथे या कामासाठी नऊ बुकिंग कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

वांद्रेतून सर्वाधिक अनारक्षित गाड्या

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोनं महागलंय, दिवाळीत घ्या हटके अन् स्टायलिश ज्वेलरी, किंमत फक्त 145 रुपयांपासून
सर्व पहा

दिवाळी आणि छठ पर्वाच्या निमित्ताने मुंबईतून उत्तर भारत आणि देशातील इतर भागात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या काळात सर्वाधिक अनारक्षित गाड्या वांद्रे टर्मिनस येथून सुटतात. त्यामुळे या ठिकाणच्या गर्दी नियंत्रणासाठी सुरक्षा यंत्रणा बळकट करण्यात आली आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Railway Ticket: ट्रेन तिकीट बुकिंगचा नवा पॅटर्न! पश्चिम रेल्वेने उचलले मोठे पाऊल; काय आहे प्लॅन?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल