5 वर्षांची कैद
होळी आणि धुलिवंदनला ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्यास 5 वर्षांची कैद, 1 लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. पुन्हा तसेच उल्लंघन सुरू ठेवल्यास दिवसाला 5 हजार रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय कायद्याच्या कलम 15 (1) नुसार शिक्षा झाल्यापासून 1 वर्षाच्या काळात अशा प्रकारचा गुन्हा केल्यास 7 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा नवी मुंबई महापालिकेने दिला आहे. या काळात महानगरपालिकेची पथके गैरप्रकार करणाऱ्यांवर लक्ष ठेवणार आहेत.
advertisement
मुंबईतील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, होळीच्या काळात प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार नाहीत!
20 मार्चपर्यंत मनाई आदेश
होळी आणि धुलिवंदनच्या दिवशी रासायनिक रंगाचा वापर करू नये. पादचाऱ्यांवर फुगे फेकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाने 20 मार्चपर्यंत ठाणे जिल्ह्यात मनाई आदेश लागू केला आहे. या आदेशाचे पालन करावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.