मॉरिसभाई आणि अभिषेक यांच्यात पहिल्यापासूनच वाद होता. मात्र दोघांमधील वाद संपवून हे दोघे एकत्र आले होते. वाद मिटवण्यासाठी आले मात्र मॉरिसभाईनं अभिषेक घोसाळकर यांचा गेमच केला. संपूर्ण फेसबुक लाईव्हपर्यंतचा प्लॅन रचून मॉरिसभाईनं अभिषेक घोसाळकर यांना मारलं आणि स्वतःचाही जीव घेतला.
Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर यांचे गोळीबाराआधीचे ते 5 मिनिट, VIDEO
advertisement
कोण आहे मॉरिसभाई नरोना?
मॉरिसभाई नरोना स्वतःला एक समाजसेवक असल्याचं सांगतो. कोरोना काळात तो जास्त चर्चेत आला. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यामुळं त्यानं अनेकांना मदतीचा हात दिला. अनेकांना रेशन वाटल्याच्या बातम्या आहेत. काही काळापूर्वीच त्यांची ओळख झालेली मात्र त्यांच्यामध्ये कोणत्या कारणावरुन नेमका वाद झाला हे अस्पष्ट आहे.
मॉरिस भाई बलात्कार, खंडणी आणि फसवणुकीसांरखे अनेक गुन्हे दाखल आहेत. पत्रकारांनाही धमकावल्याचा आरोपही मॉरिस भाईवर आहे. मॉरिस भाईने वॉर्ड नंबर 1 मधून महापालिकेची निवडणूक लढवली होती. एका महिलेची 88 लाखाची फसवणूक करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप मॉरिस भाईवर आहे. मॉरिस भाईने महिलेला धमकी दिल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता.
राजकीय वाद आणि आर्थिक वादातून ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.