ठाणे : प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका महिलेचा हात असतो, असे म्हटले जाते. पण यासोबतच आज आपण अशी एक कहाणी जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये एका महिलेच्या पाठीमागे जर पुरुष खंबीरपणे उभा राहिला, तर महिलासुद्धा चांगले यश संपादन करू शकते. ठाण्यातील एका जोडप्याने हे सिद्ध करुन दाखवले आहे.
श्यामली पातोळे आणि रोशन पातोळे या दाम्पत्याची ही कहाणी आहे. मागील चार वर्षांपासून ते एक बेकरी शॉप चालवत आहेत. ठाण्यातील तलाव पाली इथे त्यांचे श्यामलीज बेक क्रिएशन हे केक शॉप आहे. या दुकानात मिळणारे सगळे पदार्थ हे 80% इथेच बनवलेले असतात. 100 हून अधिक बेकरी प्रॉडक्ट या बेकरी शॉप मध्ये मिळतात. त्यांची किंमत फक्त 50 रुपयांपासून सुरू होते.
advertisement
गायींच्या गोवऱ्यांतून भाऊ बहीण करतायेत लाखोंची उलाढाल, सोलापुरातील प्रेरणादायी कहाणी!
या प्रकारचे केक उपलब्ध -
श्यामली यांनी सुरुवातीपासूनच क्रीमवर जास्त फोकस न करता ब्रेड आणि केकवर अधिक मेहनत घेतली. त्यामुळे येथे येणाऱ्या सगळ्यांनाच हेल्दी बेकरी फूड खायला मिळते. केकमध्ये यांच्याकडे स्विझ चॉकलेट, चॉकलेट ट्रेयो, चॉकलेट ड्युएट, सेवन लेयर बेल्जियम, मिक्स फ्रुट, प्रीमियम पाइनॅपल, प्रीमियम ब्लॅक फॉरेस्ट, बटरस्कॉच या व्हरायटी उपलब्ध आहेत.
श्यामली यांचे शिक्षण कॉमर्स मधुन झाले आहे. सुरुवातीला त्या फक्त आवड म्हणूनच केक बनवायच्या. परंतु लॉकडाऊनमध्ये त्यांच्या पतीचाही जॉब गेल्यामुळे आता काय करावे, याचा प्रश्न दोघांनाही पडला. लॉकडाउनमध्ये होममेड फुडला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत होती. याचाच विचार करून श्यामली आणि रोशन या दोघांनी केक ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर स्वतःचे केक शॉप सुरू केले आणि इथूनच त्यांचा प्रवास सुरू झाला.
photos : विवाहित प्रियकरासोबत पकडली गेली महिला पोलीस अधिकारी, घटनास्थळी एकच गोंधळ, नेमकं काय घडलं?
'बिजनेस या गोष्टीचा बॅकग्राऊंड नसल्यामुळे आपणही असे काहीतरी करू याचा कोणताच विचार पूर्वी मनात नव्हता. परंतु लॉकडाउनच्या वेळेस माझ्या पतीने मला खूप साथ दिली आणि म्हणूनच आज तलाव पालीसारख्या ठिकाणी आमच्या स्वतःचे शॉप आहे,' असे शामली यांनी सांगितले.
तुम्हालाही विविध प्रकारचे आणि कोणताही बाहेरून आणलेला कलर किंवा इसेन्स न वापरता तयार केलेले केक, पेस्ट्री यांची चव चाखायची असेल तर तुम्ही ठाण्यातील या शामली बेक क्रिएशन दुकानाला नक्की भेट देऊ शकता.