Mumbai : मुंबईकरांचा वेळ वाचणार, मोरबे ते कळंबोली प्रवास सुसाट, सरकारचा मास्टर प्लॅन समोर
Last Updated:
Mumbai News : मुंबई शहरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. शहरातील एका मुख्य मार्गातील अंतर आता मिनिटांनी कमी होणार असून वाहतूक कोंडीतून मोठी सुटका मिळणार आहे.
मुंबई : अनेक राज्याना जोडण्यासाठी मुंबई शहरात अनेक रस्ते प्रकल्प सुरु आहेत. त्यात एक आता दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावरून जेएनपीए येथे जाण्यासाठी आता अधिक सोयीचा मार्ग तयार होणार आहे. नेमका हा मार्ग कोणता असेल आणि नागरिकांना कधीपासून हा खुला होईल.
नेमका कोणत्या मार्गावरून जाणार नवीन रस्ता?
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तलासरी-मोरवे मार्गानंतर मोरबे ते कळंबोली जंक्शनदरम्यान सुमारे 13 किलोमीटर लांबीचा नवीन रस्ता बांधण्यात येणार आहे. या रस्त्याच्या आराखड्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
'हा' मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता कधी?
मंजुरी मिळाल्यामुळे प्रकल्पाला गती मिळाली असून आता लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 2027 मध्ये प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्याचे नियोजन आहे. काम सुरू झाल्यावर अंदाजे अडीच ते तीन वर्षांत रस्ता पूर्ण करण्याचा उद्देश आहे. त्यामुळे 2030 पर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो.
advertisement
प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी
नवीन रस्ता सुरू झाल्यानंतर मोरबे ते कळंबोली जंक्शन हा प्रवास फक्त 15 मिनिटांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे वाहनचालकांचा वेळ वाचेल आणि इंधनाचीही बचत होईल. विशेषतहा जेएनपीएकडे जाणारी मालवाहतूक अधिक जलद आणि सुरळीत होण्यास मदत होईल. या प्रकल्पामुळे मुंबई आणि परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासही मोठा हातभार लागणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 12, 2026 10:23 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : मुंबईकरांचा वेळ वाचणार, मोरबे ते कळंबोली प्रवास सुसाट, सरकारचा मास्टर प्लॅन समोर







