TRENDING:

राम मंदिराचे 14 स्वर्ण जडीत दरवाजे होताय तयार! पाहा प्राण प्रतिष्ठेपूर्वी अयोध्येत कशी सुरुये तयारी

Last Updated:

अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्याची तयारी जोरात सुरू आहे. मंदिराच्या तळमजल्यावर 14 दरवाजे बसवण्यात येणार असून त्यांना अंतिम स्वरूप देण्यात कारागीर व्यस्त आहेत. राम मंदिराचे 14 सुंदर घुमावदार दरवाजे महाराष्ट्रातील सागवानापासून बनवले जाताय. जे सोन्याने मढवले जाणार आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : 22 जानेवारीला अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराच्या अभिषेकाची तयारी उत्साहात सुरू आहे. सर्व प्रमुख व्यक्तींना निमंत्रण पाठवले जातेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील आणि जगातील अनेक व्हीव्हीआयपी पाहुणे या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. हा सोहळा भव्यदिव्य करण्यात सरकार कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. भगवान श्री रामलला यांचे गर्भगृह जवळपास तयार झालेय. लाईट लावण्याचे कामही पूर्ण झालेय.
राम मंदिर
राम मंदिर
advertisement

महाराष्ट्रातील सागवानापासून बनवलेले दरवाजे

राम मंदिरातील तळमजल्याचे काम जवळपास पूर्ण झालेय. दरवाजांचं काम सुरु आहे. राम मंदिराच्या तळमजल्यावरील 14 सुंदर घुमावदार दरवाजे महाराष्ट्रातून आणलेल्या सागवान लाकडापासून बनवलेय. त्यावर तांब्याचा लेप करण्यात आला आहे, त्यानंतर त्यांना सोन्याने जडवले जाईल. या कामात गुंतलेले कामगार हे हैदराबाद येथील कंपनीचे असून ते कन्याकुमारी, तामिळनाडू येथील आहेत.

advertisement

रामनगरी येथून धावणार देशातील पहिली अमृत भारत ट्रेन, या दिवशी पंतप्रधान मोदी दाखवतील हिरवा झेंडा

दरवाजे सोन्याने मढवलेले असतील

दरवाजांचे सौंदर्य आणि वैशिष्ट्ये म्हणजे सोन्याने जडवलेले आणि सुंदर कोरीव डिझाइन आहे. दरवाजांना अंतिम टच देण्यासाठी ते दिल्लीला पाठवण्यात आलेय. तेथे त्यांना कोटिंग करण्यात येईल. या दरवाजांवर भव्यतेचे प्रतीक, गज (हत्ती), सुंदर विष्णू कमळ, स्वागताच्या मुद्रेतील देवीच्या प्रतिमा कोरल्या आहेत.

advertisement

हे चारही दरवाजे एकमेकांपासून वेगळ्या डिझाइनचे आहेत. त्यांची रचना एलएनटी कंपनीने केलीये. गर्भगृहाच्या दरवाजाची उंची 8 फूट आहे. दरवाजाची रुंदी 12 फूट असून इतर दारांची उंची केवळ 8 फूट आहे. दरवाजाची रुंदी एकमेकांपेक्षा वेगळी आहे जी 12 फूटांपेक्षा कमी आहे. गरज असेल तर दरवाजा अर्धा बंद किंवा पूर्णपणे उघडला जाऊ शकतो.

advertisement

Corona : बूस्टर डोसची गरज आहे का? चौथी लस कधी? कोरोनाच्या JN.1 वर सरकारने दिले अपडेट

मंदिर नागर शैलीत बांधले जातेय

मंदिर उत्तर भारतातील नागरा शैलीत बांधले जातेय. नागारा शैली ही उत्तर भारतीय हिंदू वास्तुकलेच्या तीन शैलींपैकी एक आहे. वास्तुशास्त्रानुसार, नागर शैलीतील मंदिरांची ओळख म्हणजे पायथ्यापासून वरच्या भागापर्यंतचे चौकोनी स्वरूप होय. विशेष म्हणजे नगर शैलीतील मंदिरांमध्ये लोखंड आणि सिमेंटचा वापर केला जात नाही. भुवनेश्वरमध्ये असलेले लिंगराज मंदिर हे नागार शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. डिझाइनमध्ये मंदिरात प्रवेश करण्यासाठी चारही दिशांना चार वेगवेगळे दरवाजे बनवण्यात आलेय. सर्व वेशीवर भारतीय संस्कृतीची झलकही पाहायला मिळेल. याशिवाय मंदिरात प्रदर्शन, ध्यानमंदिर, धर्मशाळा, संशोधन केंद्र, कर्मचार्‍यांसाठी निवासस्थान, राम भगवानवर रिसर्च आणि साहित्यासाठी लायब्रेरीही बनवली जाईल.

advertisement

मराठी बातम्या/देश/
राम मंदिराचे 14 स्वर्ण जडीत दरवाजे होताय तयार! पाहा प्राण प्रतिष्ठेपूर्वी अयोध्येत कशी सुरुये तयारी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल