Corona : बूस्टर डोसची गरज आहे का? चौथी लस कधी? कोरोनाच्या JN.1 वर सरकारने दिले अपडेट
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
दिलासा देणारी बाब म्हणजे ओमिक्रॉनच्या नव्या सब व्हेरिअंटची प्रकरणं अधिक गंभीर नाहीत. याचा संसर्ग झालेल्यांना रुग्णालयात भरती करावं लागलेलं नाही.
दिल्ली, 25 डिसेंबर : भारतात कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोनाच्या नव्या सब व्हेरिअंट JN.1ची भारतात एन्ट्री झाली आहे. केरळमध्ये पहिला रुग्ण आढळल्यानंतर आता गोवा आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यात रुग्णसंख्येत वाढ दिसून आली आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्य सरकारांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सरकारने हे स्पष्ट केलं की, सध्या बूस्टर डोस किंवा चौथी लस घेण्याची काही गरज नाही. भारत SARS-CoV-2 जिनोमिक्स कंसोर्टियमचे प्रमुख एन के अरोरा यांनी सांगितले की, सब व्हेरिअंट समोर आल्यानतंर कोरोना लसीच्या बूस्टर डोसची काहीही गरज नाहीय.
advertisement
अरोरा म्हणाले की, फक्त ६० वर्षांवरील लोक आणि ज्यांना गंभीर आजार आहे ते खबरदारी म्हणून तिसरा डोस घेऊ शकतात. अद्याप एकही लस घेतली नसेल तर ते घेऊ शकतात. तसंच सर्वसामान्य लोकांना सध्या चौथ्या डोसची गरज नाही. आम्ही लोक घाबरून जातील असा सल्ला देणार नाही.
दिलासा देणारी बाब म्हणजे ओमिक्रॉनच्या नव्या सब व्हेरिअंटची प्रकरणं अधिक गंभीर नाहीत. याचा संसर्ग झालेल्यांना रुग्णालयात भरती करावं लागलेलं नाही. JN.1 सबव्हेरिअंट लक्षणांमध्ये ताप, नाकातून पाणी येणं, खोकला, कधी कधी शरीरात वेदना होणं यांचा समावेश आहे. सर्वसामान्यपणे हे आजार आठवड्याभरात बरे होतात. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याआधीच राज्यांना टेस्ट वाढवण्याचे आदेश दिले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 25, 2023 12:44 PM IST
मराठी बातम्या/देश/
Corona : बूस्टर डोसची गरज आहे का? चौथी लस कधी? कोरोनाच्या JN.1 वर सरकारने दिले अपडेट