अखेर 303 भारतीय प्रवाशांना दिलासा, 3 दिवसांनी फ्रान्सने विमान उड्डाणाला दिली परवानगी
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
विमान उड्डाणाची परवानगी दिली असली तरी ते आता निकारागुआला जाणार की पुन्हा भारतात परतणार याबाबत अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
पॅरिस, 25 डिसेंबर : मानवी तस्करीच्या संशयावरून फ्रान्स सरकारने ताब्यात घेतलेल्या विमानातील ३०३ भारतीय प्रवाशांना आता दिलासा मिळाला आहे. प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्यांची चौकशी सुरू होती. संयुक्त अरब अमिरातीहून विमानाने उड्डाण केल्यानंतर फ्रान्सने मानवी तस्करीच्या संशयावरून गुरुवारी विमान उतरवलं होतं.
फ्रान्समध्ये गुरुवारपासून ३०३ प्रवाशांची चौकशी सुरू होती. या प्रकरणी भारतीय दूतावासानेही लक्ष घालत आढावा घेतला होता. दरम्यान, विमानतळावरच न्यायालय स्थापन करून प्रवाशांची सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला होता. पण आता विमानतळ प्रशासनाने विमान उड्डाणाला परवानगी दिली. न्यायालयीन प्रक्रियेतील त्रुटींमुळे सुनावणी रद्द केली गेली.
advertisement
विमान उड्डाणाची परवानगी दिली असली तरी ते आता निकारागुआला जाणार की पुन्हा भारतात परतणार याबाबत अद्याप स्पष्ट झालेलं नाही. बहुतांश प्रवासी हे भारतीय असल्याने ते भारतात आणलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, फ्रान्सच्या माध्यमांनुसार काही प्रवासी हे हिंदी, तामिळमध्ये बोलत होते. या विमानात ११ लहान मुले ही पालकांशिवाय प्रवास करत होती. १० प्रवाशांनी फ्रान्समध्ये आश्रय घेण्यासाठी विनंती केली असल्याची माहिती समोर येतेय.
advertisement
विमान रोमानियन चार्टर कंपनी लिजंड एअरलाइन्सच्या मालकीचे आहे. कंपनीच्या वकिलांनी सांगितले की, मानवी तस्करीत कोणत्याही प्रकारचा सहभाग नाही. एका भागिदार कंपनीने विमान भाड्याने घेतले होते आणि प्रत्येक प्रवाशाची ओळख आणि कागदपत्रे तपासण्याची जबाबदारी त्यांची होती. उड्डाणाआधी प्रवाशांच्या पासपोर्टची माहिती विमान कंपनीला दिली जाते.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 25, 2023 9:12 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
अखेर 303 भारतीय प्रवाशांना दिलासा, 3 दिवसांनी फ्रान्सने विमान उड्डाणाला दिली परवानगी









