TRENDING:

Fisherman Dies : मासेमारी करायला समुद्रात गेला, बोटीवर अचानक आलेल्या माशाने चावा घेतला, 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Last Updated:

Fisherman Dies due to Fish Attack : मासेमारी करताना एका विषारी माशाने केलेल्या आघाताने तरुण जखमी झाला. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कारवार: समु्द्रात आपल्या मित्र-सहकाऱ्यांसोबत मासेमारी करण्यासाठी गेलेल्या 24 वर्षीय तरुणाचा विचित्र घटनेत मृत्यू झाला. मासेमारी करताना एका विषारी माशाने केलेल्या आघाताने तरुण जखमी झाला. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
मासेमारी करायला समुद्रात गेला, बोटीवर अचानक आलेल्या माशाने चावा घेतला, 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू
मासेमारी करायला समुद्रात गेला, बोटीवर अचानक आलेल्या माशाने चावा घेतला, 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू
advertisement

उत्तर कर्नाटक भागातील कारवार परिसरात घडलेली एक दुर्दैवी घटना सर्वांना हादरवून गेली आहे. २४ वर्षीय अक्षय अनिल माजाळीकर नावाच्या तरुणाचा मासेमारीदरम्यान अपघाती मृत्यू झाला आहे. समुद्रात मासेमारी करताना एका माशाने त्याला जोरदार तडाखा मारत डंक दिला. माशाचा हा वार घुसल्याने तरुण गंभीर जखमी झाला होता. दोन दिवस उपचार घेतल्यानंतर शुक्रवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.

advertisement

अक्षय हा आपल्या सहकाऱ्यांसह मासेमारीसाठी समुद्रात उतरला होता. बोटीवर बसलेला असतानाच समुद्रातून उडी घेतलेल्या माशाने थेट त्याच्या शरीरावर धडक मारली. त्या धडकेत अक्षयच्या पोटाच्या भागात खोल जखम झाली. सहकाऱ्यांनी त्याला तातडीने किनाऱ्यावर आणून कारवार किम्स रुग्णालयात दाखल केले. दोन दिवस उपचार चालले, मात्र जखमेचा संसर्ग वाढल्याने त्याचा मृत्यू झाला.

स्थानिकांच्या माहितीनुसार, "आक्षेन टोळी" (स्थानिक नाव) या जातीच्या सुमारे 8 ते 10 इंच लांबीच्या माशाने होडीत उडी मारून त्याच्या पोटावर चावा घेतला. या माशाच्या शरीरावर अत्यंत टोकदार काटे असतात. या माशाच्या चाव्याने, डंक मारल्यास माणसासाठी जीवघेणे ठरू शकतात.

advertisement

या घटनेनंतर मृत तरुणाच्या पालकांनी रुग्णालयातील डॉक्टरांवर उपचारात निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. जखमेची गंभीरता ओळखून योग्य उपचार न केल्यानेच मुलाचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. डॉक्टरांनी फक्त बाह्य जखमेवर टाके घालून उपचार केले, परंतु आतल्या भागात संसर्ग झाल्याने परिस्थिती बिघडली, असा आरोप करण्यात आला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लहानांपासून मोठ्यांना आवडेल, दिवाळीला घरीच बनवा चॉकलेट बर्फी‎, रेसिपीचा Video
सर्व पहा

स्थानिक नागरिकांनीही या भागात अनुभवी डॉक्टरांचा अभाव असल्याचे सांगत रुग्णालय प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे कारवार परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मासेमारीदरम्यान सुरक्षा उपायांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

advertisement

मराठी बातम्या/देश/
Fisherman Dies : मासेमारी करायला समुद्रात गेला, बोटीवर अचानक आलेल्या माशाने चावा घेतला, 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल