TRENDING:

बाथरूममध्ये सापडला विधवेचा मृतदेह, मुलीच्या साक्षीने केस फिरली, आरोपीचा चेहरा पाहून कुटुंब हादरलं!

Last Updated:

दुसरं लग्न करून आपलं आयुष्य पुन्हा सुरू करणारी 35 वर्षीय विधवा रेश्मा हिचा मृतदेह तिच्या बाथरूममध्ये आढळला. रेशमाच्या मुलीने दिलेल्या साक्षीमुळे या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दुसरं लग्न करून आपलं आयुष्य पुन्हा सुरू करणारी 35 वर्षीय विधवा रेश्मा हिचा मृतदेह तिच्या बाथरूममध्ये आढळला. रेश्माचा पती प्रशांत कुमार याच्यावर रेश्माच्या हत्येचा आरोप आहे. रेश्माने जवळपास 15 वर्षांपूर्वी तिचा पहिला पती गमावला होता, यानंतर तिने मुलीचं संगोपन करण्यासाठी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. उपजीविकेसाठी रेश्मा आसपासच्या परिसरात घरकाम करायला लागली, पण सोशल मीडियामुळे रेश्माच्या आयुष्याला वेगळं वळण मिळालं.
बाथरूममध्ये सापडला विधवेचा मृतदेह, मुलीच्या साक्षीने केस फिरली, आरोपीचा चेहरा पाहून कुटुंब हादरलं! (AI Image)
बाथरूममध्ये सापडला विधवेचा मृतदेह, मुलीच्या साक्षीने केस फिरली, आरोपीचा चेहरा पाहून कुटुंब हादरलं! (AI Image)
advertisement

वर्षभरापूर्वी रेश्मा इन्स्टाग्रामवर प्रशांत कुमारला भेटली. यानंतर दोघांमध्ये चॅटिंगला सुरूवात झाली आणि कालांतराने दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. प्रशांतने स्वतःला काळजी घेणारा आणि विश्वासार्ह दाखवलं, त्यानंतर तो रेश्माच्या आयुष्याचा रोजचाच एक भाग बनला. दोघांच्याही परिस्थितीमध्ये फरक असूनही दोघांचे नाते अधिकच घट्ट झाले. रेश्मा विधवा होती, तसंच तिला एक किशोरवयीन मुलगीही होती, तर प्रशांत अविवाहित होता. प्रशांतने रेश्माला नवीन सुरूवात करण्याचं आश्वासन दिलं, यानंतर 9 महिन्यांपूर्वी दोघांनी लग्न केलं, आणि ओम शक्ती लेआउटमध्ये ते एकत्र राहायला लागले.

advertisement

रेश्मा आणि प्रशांत सुरूवातीला आनंदी दिसत होते, पण कालांतराने त्यांच्यात भांडणं होऊ लागली, असं शेजार्यांनी सांगितलं. प्रशांतला रेश्माच्या चारित्र्यावर संशय आला होता, त्यामुळे दोघांमध्ये सतत भांडणं व्हायची. 15 ऑक्टोबरच्या रात्री संशयाचं रुपांतर हिंसाचारात झाले आणि प्रशांतने रागाच्या भरात रेश्माची गळा दाबून हत्या केली.

रेश्माची हत्या केल्यानंतर प्रशांतने हा अपघात असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याने रेश्माचा मृतदेह बाथरूममध्ये ठेवला आणि वॉटर हिटरचा स्विच चालू केला, यानंतर तो घरातून निघून गेला. विजेचा शॉक लागल्यामुळे रेश्माचा मृत्यू झाल्याचा दिखावा प्रशांतने केला. संध्याकाळी रेश्माची मुलगी शाळेतून घरी परतली तेव्हा तिला घराचा दरवाजा उघडा दिसला. यानंतर मुलगी घरात आली तेव्हा तिला आई बाथरूममध्ये पडली असल्याचं तिला दिसलं, यानंतर ती शेजाऱ्यांना बोलावण्यासाठी धावली. शेजारऱ्यांनी रेश्माला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

advertisement

मुलीच्या साक्षीने केस फिरली

सुरूवातीला रेश्माच्या नातेवाईकांनाही हा अपघात असल्याचं वाटलं, पण प्रशांतने विसंगत विधाने केल्याने रेश्माची बहीण रेणुकाचा संशय वाढला, म्हणून रेणुकाने प्रशांतला फोन केला, तेव्हा आपण गावाला जात असल्याचं आणि आपल्याला काहीच माहिती नसल्याचं प्रशांत म्हणाला. पण पुढच्या काही मिनिटांमध्येच प्रशांत रडत रुग्णालयात पोहोचला. रेश्माच्या मुलीने बाथरूमचा दरवाजा बाहेरून बंद होता, असं सांगितलं तेव्हा या प्रकरणाला वेगळं वळण लागलं.

advertisement

प्रशांत पोलिसांच्या ताब्यात

बंगळुरू इलेक्ट्रॉनिक सिटी उपविभागांतर्गत असलेल्या हेब्बागोडी पोलिसांनी प्रशांतला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याने रेश्माची हत्या केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी घटनाक्रमाची पुनर्रचना केली, ज्यात प्रशांतने शॉक लागून रेश्माचा मृत्यू झाल्याचा बनाव करण्यासाठी वॉटर हिटर सुरू ठेवल्याचं स्पष्ट झाले, यानंतर पोलिसांनी प्रशांतला अटक केली आहे.

मुलगी एकटी पडली

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवाळ्यात गाईचे तूप आरोग्यासाठी फायदेशीर, त्वचा राहील तजेलदार,आणखी हे फायदे पाहा
सर्व पहा

या हत्येमुळे परिसरात खळबळ माजली आहे. रेश्माची 15 वर्षांची मुलगी आधीच वडिलांशिवाय आयुष्य जगत होती, आता तिने आईलाही गमावलं आहे.

मराठी बातम्या/देश/
बाथरूममध्ये सापडला विधवेचा मृतदेह, मुलीच्या साक्षीने केस फिरली, आरोपीचा चेहरा पाहून कुटुंब हादरलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल