याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भीषण अपघात डुमरदगाला जाणाऱ्या मार्गावर झाला. अपघातग्रस्त कारचा वेग जास्त होता अशी स्थानिकांनी माहिती दिली. कार अनियंत्रित झाल्यानंतर खांबाला धडकली. त्यानंतर कार पलटी झाली. यात चारही तरुणांचा मृत्यू झाला.
बसचा भीषण अपघात, डंपरला धडकताच घेतला पेट; 13 जणांचा होरपळून मृत्यू, 25 जखमी
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघाताची नोंद पोलीसात करण्यात आली असून चौकशी केली जात आहे. अपघात होऊ नयेत यासाठी वेळोवेळी वाहतूक विभागाकडून जागरुकता मोहिम राबवण्यात येते. मात्र तरीही भरधाव वेग आणि नियम न पाळल्याने अपघात होत आहेत.
याआधी रांचीतील ओरमांझी इथं उकरीदजवळ अपघात झाला होता. जमशेदपूरहून आराला जाणाऱ्या बसने मागून धडक दिली होती. यात बसचा पुढच्या भागाचा चक्काचूर झाला होता. तर एकाचा मृत्यू झाला होता. गेल्या आठवड्यात रांचीतच दोन वाहनांच्या भीषण धडकेत दोन तरुण ठार झाले होते.