भारत-पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ही घोषणा सर्वांसाठी धक्कादायक ठरली. या घोषणेनंतर जयराम रमेश यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ते म्हणतात, वॉशिंग्टन डीसी कडून झालेल्या अभूतपूर्व घोषणा लक्षात घेता. आता सर्वपक्षीय बैठक आणि संसदेचे तातडीने विशेष अधिवेशन बोलवणे हे पूर्वीपेक्षा जास्त गरज आहे.
advertisement
भारत-पाकिस्तानमध्ये तातडीने शस्त्रसंधी, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
रमेश यांनी सध्याच्या संवेदनशील आणि गुंतागुंतीच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी पहिली आणि महत्त्वाची मागणी केली आहे. या बैठकीचा मुख्य उद्देश हा सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेणे. त्यांना सद्यस्थितीची आणि सरकारने उचललेल्या किंवा उचलणार असलेल्या पावलांची माहिती देण्याचा असावा असे रमेश म्हणाले आहेत.
भारताच्या मोठ्या विजयानंतर पाकिस्तान गुडघ्यावर...; शस्त्रसंधी का मान्य केली
काँग्रेस नेते रमेश यांनी केलेली दुसरी मागणी म्हणजे संसदेचे तातडीने विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे. या अधिवेशनात गेल्या सुमारे अठरा दिवसांतील महत्त्वपूर्ण घडामोडींवर सखोल चर्चा झाली पाहिजे. विशेषतः जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यापासून सुरू झालेल्या घटना, त्यानंतर भारताने घेतलेली भूमिका, आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी आणि अमेरिकेने शस्त्रसंधीबाबत केलेली घोषणा या सर्व बाबींवर संसदेत चर्चा व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.